Yogesh Mogre Case : कंपनीचे तरूण CEO याेगेश माेगरेंच्या हत्येचा झाला उलगडा, धक्कादायक कारण आलं समोर

कार बेळगाव कुर्हे येथे आढळून आली हाेती.
nashik, haryana, belgaum, car, police
nashik, haryana, belgaum, car, policesaam tv
Published On

- तबरेज शेख

Yogesh Mogre News : गाडी चोरण्याच्या उद्देशाने नाशिकच्या इंदिरानगर पोलीस ठाणे हद्दीतील कंपनीत CEO पदावर असलेल्या योगेश मोगरे (yogesh mogre nashik) यांचा खून केल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे. घटनेतील एका अल्पवयीन संशयित आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतल्याची माहिती नाशिक पाेलीस उपायुक्त प्रशांत बच्छाव यांनी दिली. (Maharashtra News)

nashik, haryana, belgaum, car, police
Cancelled Trains List : महाराष्ट्र एक्सप्रेससह १२ गाड्या रद्द; जाणून घ्या कारण

या घटनेबाबत पाेलिसांनी दिलेल्या माहितीनूसार अंबड MIDC मधील रोहिणी इंडस्ट्रीजचे CEO योगेश मोगरे हे पांडवलेणी परिसारत सर्व्हिस रोड येथे असलेल्या आंगण हॉटेलच्या बाहेर टपरीवर उभे असताना दोघांनी मोगरे यांच्याकडे असलेली गाडी चोरण्याच्या उद्देशाने चावी घेण्याचा प्रयत्न केला.

मात्र मोगरे यांनी त्यास विराेध दर्शविला. त्यामुळे संशयितांचा राग अनावर झाला. त्यांनी त्यांच्याजवळ असलेल्या चाकूने माेगरे यांच्यावर वार केले. त्यांनतर दोघे संशयित हे मोगरे यांची कार घेऊन पसार झाले.

nashik, haryana, belgaum, car, police
Naresh Mhaske Statement : पवार कुटुंब समजायला... गद्दारीच्या टीकेवर काका पुतण्यांसह सुळेंचे उत्तर (पाहा व्हिडिओ)

या घटनेनंतर इंदिरानगर पोलीस ठाण्यात अज्ञातांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. या घटनेचा तपास गुन्हे शाखा 2 कडे देण्यात आला होता. त्यांनतर गुन्हे शाखेचे एकूण 6 पथके संशयितांच्या शोध घेण्यासाठी रवाना झाली होती.

साक्षीदार,CCTV आणि काही भौतिक पुराव्यांच्या आधारे गुन्हे शोध पथकाने हरियाणा येथून एका अल्पवयीन संशयिताला ताब्यात घेतले. त्याच्याकडे चौकशी केली असता अल्पवयीन संशयित आणि त्याचा आणखी एक साथीदार हे हरियाणा येथून मुंबई येथे काेणाला तरी जबरदस्तीने पळवून नेण्याच्या उद्देशाने आले हाेते.

nashik, haryana, belgaum, car, police
Nitin Gadkari's Panvel Speech: खरोखर मी थकलाेय आता, इजा...बिजा.. आता तिजा असं का म्हणाले नितीन गडकरी (पाहा व्हिडिओ)

त्यासाठी संशयितांना कारची गरज हाेती. त्यामुळे माेगरे यांच्यावर हल्ला केल्याचे पाेलीस तपासात निष्पन्न झाल्याची माहिती प्रशांत बच्छाव (पोलीस उपआयुक्त, नाशिक) यांनी दिली. दरम्यान या घटनेतील एकास अटक केली आहे दुसरा संशयित आरोपी अजितसिंग सत्यवान लठवाल याचा पोलीस शोध घेताहेत.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com