arrest
arrest

फरार डाॅक्टर सापडला; महात्मा गांधी चौकी पोलिसांची कारवाई

Published on

सांगली : काेविड १९ च्या रुग्णाच्या मृत्यू प्रकरणी मिरज येथील अपेक्स केअर रुग्णालयातील apex hospital miraj आणखी एका वैद्यकीय अधिका-यास पाेलिसांनी अटक केली. सांगली येथील छातीरोग तज्ञ डॉ. शैलेश बरफे असे अटक arrest केलेल्या डाॅक्टरचे नाव आहे. त्याच्यावर महात्मा गांधी चौक पोलिसांनी कारवाई केली आहे. एकूण ८७ काेविड १९ रुग्णांच्या covid 19 मृत्यू प्रकरणी आत्ता पर्यंत १६ जणांना अटक करण्यात आली आहे.

arrest
उदय सामंत म्हणजे कोकणातले शक्ती कपूर, सचिन वाझेंचे भाऊ : राणे

काेविड १९ च्या दुसऱ्या लाटेत मिरजे येथील अपेक्स केअर सेंटर या रुग्णालयात काेविड १९ च्या रुग्णांच्या झालेल्या मृत्यू प्रकरणी मिरज येथील महात्मा गांधी चौकी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल झाल्या होत्या. त्यानंतर पोलिसांनी या प्रकरणी सखोल चौकशी करुन अनेक धक्कादायक गोष्टी जनतेच्या समोर आणल्या. व्हेंटिलेटर नसताना ताे दाखवून उपचार करण्याबरोबर चुकीचे पद्धतीने उपचार केल्याने ८७ रूग्णांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक माहिती समोर आणली.

या रुग्णालयाचे संचालक डॉक्टर महेश जाधव यासह रुग्णालयीन कर्मचारी, रुग्णवाहिका चालक जाधव याचा डॉक्टर भाऊ, एजंट असे एकूण १५ जणांना अटक केली हाेती. आता सांगली येथील छाती रोग तज्ञ डॉक्टर शैलेश बरफे याचा देखील यामध्ये सहभाग असल्याचे समोर आले. डॉ. बरफे हा फरार होता. त्याने न्यायालयात अटकपूर्व जामीन मिळावा यासाठी अर्ज केला होता. तो न्यायालयाने फेटाळला. सोमवारी रात्री उशिरा महात्मा गांधी चौकी पोलिसांनी डॉ. बरफे यास अटक केली.

edited by : siddharth latkar

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com