Narendra Modi Speech : नकली शिवसेनेने याकूब मेमनची कबर सजवली : पंतप्रधान नरेंद्र मोदी

Narendra Modi latest News : सकाळी नांदेडमध्ये सभेसाठी हजेरी लावल्यानंतर परभणीत महायुतीचे उमेदवार महादेव जानकर यांच्या प्रचारार्थ सभेत मोदींनी उपस्थिती दर्शवली. या सभेतून पंतप्रधान नरेंद्र मोदींनी विरोधकांवर निशाणा साधला.
Narendra Modi Parbhani
Narendra Modi Parbhani Saam TV

परभणी : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी आज शनिवारी महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहेत. सकाळी नांदेडमध्ये सभेसाठी हजेरी लावल्यानंतर परभणीत महायुतीचे उमेदवार महादेव जानकर यांच्या प्रचारार्थ सभेत मोदींनी उपस्थिती दर्शवली. या सभेतून पंतप्रधान नरेंद्र मोदींनी विरोधकांवर निशाणा साधला.

नरेंद्र मोदी काय म्हणाले?

>> २०१४ मध्ये पहिल्यांदा लोकसभेची निवडणूक लढवली. त्याआधी टीव्हीवर दहशतवादी हल्ला, सैनिक शहीद होणे या घटनांवर टीव्हीवर चर्चा व्हायच्या. मात्र, २०१४ नंतर एनडीए आघाडीचं सरकार स्थापन झाल्यानंतर या चर्चा बदलल्या.

>>कोणतीही जात किंवा पंथ असो, आम्ही सर्वांसाठी काम करतो. ४० हजार जणांना पक्के घरे दिली.

>>जे मागासवर्गीय लोक वंचित राहिले आहेत, ज्या लोकांना काही सुविधा मिळाल्या नाहीत. त्यांना मोदींची गॅरंटी आहे. त्यांना तिसऱ्या टर्ममध्ये सुविधा मिळतील. गरीबांना मोफत रेशन देत आहे. पुढेही देऊ. लोकांना आरोग्य सुविधा मिळत आहे.

>>मी तुमच्या सारख्या मागासवर्गीय वर्गातून आलो आहे. मी सहन केलं, ते गरीबांनी सहन करू नये. त्यासाठी मी प्रयत्न करत आहे.

Narendra Modi Parbhani
Madha Lok Sabha: माढा लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात स्वरुप जानकरांची एन्ट्री; बसपाकडून भरला उमेदवारी अर्ज

>>मराठवाडा हा शेतकरी पट्टा आहे. मागच्या कार्यकाळात जलयुक्त शिवार योजना सुरु झाली. या योजना रोखण्याचं काम इंडिया आघाडीने केलं. आधी पीक विमा मिळत नव्हता. आता लोकांना पीक विमा मिळत आहे. परभणी आत्मनिर्भर करण्यास मदत करेल. जगात सुपरफूड पोहोचवत आहे.

>> काँग्रेसने देशाचं विभाजन केलं. नकली शिवेसेने याकूब मेमनची कबर सजवली. परभणी बाळासाहेब ठाकरेंची प्रेरणा देणारं शहर आहे.

Narendra Modi Parbhani
Dr. Jyoti Mete : मोठी बातमी! शिवसंग्रामच्या नेत्या डॉ. ज्योती मेटे यांची लोकसभा निवडणुकीतून माघार

>>मी तुमच्यांकडून आशीर्वाद घ्यायला आलो आहे. एनडीएचे उमेदवार, माझे लहान भाऊ महादेव जानकर यांना विजयी करायचं आहे.

>> तुम्हाला प्रत्येक घरात जायचं आहे. तुम्हाला अधिक मतदान करायचं आहे. तुम्हाला प्रत्येक पोलिंग बुथमध्ये जिंकायचं आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com