Pradhan Mantri Kisan Samman Nidhi : राज्यातील ९२ लाख शेतकऱ्यांच्या खात्यावर पाच ऑक्टोबर रोजी चार हजार रुपये जमा होणार आहेत, कृषीमंत्री धनंजय मुंडे यांनी याबाबतची माहिती दिली. पीएम किसान सन्मान निधी योजना व नमो शेतकरी महा सन्मान निधी योजना या योजनांचे ऑगस्ट-नोव्हेंबरचे हप्ते जमा होणार आहेत. ५ ऑक्टोबर रोजी सकाळी ११ वाजता वाशिम येथील समारंभात राज्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावर ४ हजार रुपये जमा होणार आहेत. पाच ऑक्टोबर रोजी वाशिम येथे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या शुभहस्ते योजनाचे हप्ता शेतकऱ्याच्या खात्यात जमा होतील. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, यवतमाळ -वाशिमचे पालकमंत्री संजय राठोड आदी मान्यवर उपस्थित राहणार असल्याची माहिती कृषीमंत्री धनंजय मुंडे यांनी दिली.
शेतक-यांना निश्चित उत्पन्न देण्याकरीता केंद्र शासनाने प्रधानमंत्री किसान सन्मान निधी (पीएम किसान) योजना फेब्रुवारी, 2019 पासून सुरु केली आहे. या योजनेच्या निकषांनुसार सर्व पात्र शेतकरी कुटुंबास (पती, पत्नी व त्यांची 18 वर्षाखालील अपत्ये) रु. 2000/- प्रती हप्ता या प्रमाणे तीन समान हप्त्यात प्रती वर्षी रू. 6000/- त्यांच्या आधार व डीबीटी संलग्न सक्रीय बँक खात्यात लाभ जमा करण्यात येत आहे. पीएम किसान योजनेअंतर्गत दिनांक 30 सप्टेंबर, 2024 अखेर राज्यातील जवळपास 1.20 कोटी शेतकरी कुटुंबांना एकूण 17 हप्त्यांमध्ये सुमारे रू. 32000 कोटीचा लाभ जमा झालेला आहे.
पीएम किसान योजनेच्या धर्तीवर महाराष्ट्र राज्यात सन 2023-24 पासून नमो शेतकरी महासन्मान योजनेची अंमलबजावणी करण्यात आली. पीएम किसान योजनेच्या 14 व्या हप्त्यापासून पुढील प्रत्येक हप्ता वितरणावेळी लाभ देण्यात आलेल्या राज्यातील पात्र शेतकरी कुटुंबांना या योजनेचा लाभ अदा करण्यात येत आहे. महाराष्ट्र शासनाने 2023-24 व 2024-25 या आर्थिक वर्षात एकूण चार हप्त्यांमध्ये एकूण 91.45 लाख शेतकरी कुटुंबाना रक्कम रु. 6949.68 कोटी लाभ दिला. जून 2023 पासून आयोजित गाव पातळीवरील विशेष मोहिमांद्वारे पीएम किसान योजनेच्या लाभासाठी बंधनकारक असलेल्या बाबींची 20 लाखाहून अधिक शेतकऱ्यांची पूर्तता झाल्याने देश पातळीवर दुसर्या क्रमांकावर महाराष्ट्रातील शेतकरी कुटुंबांची संख्या आजरोजी योजनेच्या लाभासाठी पात्र ठरली आहे.
केंद्र शासनाच्या पीएम किसान योजनेच्या 18 व्या हप्त्याच्या लाभ वितरणावेळी राज्यातील भूमि अभिलेख नोंदी अद्ययावत केलेल्या, बँक खाती आधार संलग्न केलेल्या व ईकेवायसी पूर्ण केलेल्या एकूण 91.52 लाख शेतकरी कुटुंबांच्या बँक खात्यात रू. 1900 कोटीहून अधिक रक्कमेचा लाभ तर राज्याच्या योजनेमधून रू. 2000 कोटीहून अधिक रक्कमेचा लाभ शेतकऱ्यांच्या आधार संलग्न बॅंक खात्यात थेट हस्तांतरणाद्वारे जमा होणार आहे.
या समारंभामध्ये पीएम किसान योजने अंतर्गत 2000 रुपये तर नमो शेतकरी महा सन्मान निधी योजने अंतर्गत 2000 रुपये असा एकूण 4000 रुपयांचा लाभ पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते राज्यातील सुमारे 91.52 लाख पात्र शेतकरी कुटुंबांच्या आधार संलग्न बॅंक खात्यात थेट जमा होईल.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.