नंदुरबारमध्ये संत निरंकारी मंडळातर्फे २०४ वृक्षांची लागवड व संवर्धन मोहिम...

निरंकारी सद्गुरु माता सुदिक्षाजी महाराज यांच्या प्रेरणेने ऑगस्ट महिन्यापासून देशभरात सुमारे एक लाख 75 हजार वृक्ष लागवड करण्यात आली.
नंदुरबारमध्ये संत निरंकारी मंडळातर्फे २०४ वृक्षांची लागवड व संवर्धन मोहिम...
नंदुरबारमध्ये संत निरंकारी मंडळातर्फे २०४ वृक्षांची लागवड व संवर्धन मोहिम...दिनू गावित
Published On

नंदुरबार: नंदुरबार तालुक्यातील उमर्दे खुर्द येथील अमरधाम परिसरात २०४ वृक्षांची लागवड करण्यात आली. पुढील तीन वर्षे या वृक्षांचे संवर्धन करण्यात येणार असल्याची माहिती संत निरंकारी मंडळ धुळे विभागाचे प्रमुख हिरालाल पाटील यांनी दिली. (Plantation and conservation campaign of 204 trees by Sant Nirankari Mandal in Nandurbar)

हे देखील पहा -

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त एकात्मतेचे प्रतीक म्हणून हा उपक्रम मंडळाने हाती घेतला आहे, त्यात वृक्ष लागवड करून तीन वर्ष या वृक्षांचे संवर्धन करण्यात येईल. त्यानंतर ग्रामपंचायतीला हस्तांतरित करण्यात येईल. निरंकारी सद्गुरु माता सुदिक्षाजी महाराज यांच्या प्रेरणेने ऑगस्ट महिन्यापासून देशभरात सुमारे एक लाख 75 हजार वृक्ष लागवड करण्यात आली. देशातील 280 शहरात 350 ठिकाणी ही लागवड करण्यात आली आहे. त्याचाच एक भाग म्हणून उमर्दे येथे 204 वृक्षांची लागवड व संवर्धन करण्यात येणार आहे. त्यासाठी ग्रामस्थांसह सेवेकर यांचे व मान्यवरांचे सहकार्य लाभले या ठिकाणी ठिंबक सिंचनच्या माध्यमातून पाण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. यावेळी 204 वृक्षांमध्ये वड, पिंपळ, निंब यासह विविध वृक्षांची लागवड करण्यात आली. कार्यक्रमाच्या सुरुवातीला फलक अनावरण करून तसेच प्रार्थना म्हणून शुभारंभ करण्यात आला.

नंदुरबारमध्ये संत निरंकारी मंडळातर्फे २०४ वृक्षांची लागवड व संवर्धन मोहिम...
नागपूर ते अमरावती मेट्रो सुरू करणार - केंद्रीय मंत्री नितीन गडकरी

यावेळी नंदुरबार शाखेचे प्रमुख पुंडलिक निकुंभे, सरपंच अरविंद ठाकरे पंचायत समितीचे उप अभियंता इ सी भामरे, ग्रामसेवक भरत गुले, श्रावण पाटील, गुलाब मराठे, आनंदराव कदमबांडे, दिलीप कदमबांडे, गोविंद पायमुळे, श्री साळुंखे, हिम्मतराव गिरासे, राजेंद्र कदमबांडे, जाधव, मुकेश भामरे यांच्यासह ग्रामस्थ व मंडळाचे सेवेकरी उपस्थित होते.

Edited By - Akshay Baisane

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com