Pimpri Chinchwad Police : शेतकऱ्यांच्या मदतीला सरसावले पिंपरी चिंचवड पोलीस; ४४ लाख रुपयाची मदत

Pimpri Chinchwad News : मुसळधार पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. शेतकऱ्यांना मदतीचा हात म्हणून अनेक संस्था- संघटना पुढे आल्या असून पिंपरी चिंचवड पोलिसांनी देखील पुढाकार घेत मदत दिली
Pimpri Chinchwad Police
Pimpri Chinchwad PoliceSaam tv
Published On

पिंपरी चिंचवड : राज्यात झालेल्या मुसळधार पावसाने प्रचंड नुकसान झाले आहे. प्रामुख्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले असून यात शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदतीचा ओघ सुरु असून आता अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीला पिंपरी चिंचवड पोलीस सरसावले असून मुख्यमंत्री सहायता निधीला तब्बल ४३ लाख ९५ हजार रुपयाची मदत सुपूर्द केली आहे. 

राज्यातील जवळपास सर्वच भागात मुसळधार पावसाने थैमान घातले होते. सलग दोन आठवडे पाऊस झाल्याने शेतकऱ्याच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेला आहे. यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मुख्यमंत्री सहायता निधीतून मदत दिली जात आहे. यासाठी ठिकठिकाणाहून मदतीचा ओघ सुरु असून पिंपरी चिंचवड पोलीस देखील मागे राहिले नाही. 

Pimpri Chinchwad Police
Jalgaon : ओल्या दुष्काळाची मागणी दुर्लक्षितच; जळगाव जिल्ह्यात २५ हजार हेक्टरवर कापसाचे नुकसान

पोलीस प्रशासनाकडून ४३ लाख ९५ हजाराचा निधी 

अतिवृष्टीमुळे पश्चिम महाराष्ट्रातील सोलापूर जिल्हा त्याचबरोबर मराठवाड्यातील जालना, बीड, लातूर आणि धाराशिव जिल्ह्यात शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झालं आहे. शेतकऱ्यांच्या मदतीसाठी समाजातील वेगवेगळ्या घटकांनी पुढाकार घेतला आहे. त्यातच पिंपरी चिंचवड शहर पोलिसांनी देखील आपलं सामाजिक जाणीवेच भान जपत अतिवृष्टी ग्रस्त शेतकऱ्यांसाठी तब्बल ४३ लाख ९५ हजार रुपयाची अर्थिक मदत केली आहे. 

Pimpri Chinchwad Police
Kalyan : मध्यरात्री बारवर पोलिसांची छापेमारी; महिला वेटरकडून अश्लील चाळ्यांचा पर्दाफाश

मुख्यमंत्र्यांकडे धनादेश सुपूर्द 

पिंपरी चिंचवड शहराचे पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे यांनी अतिवृष्टी ग्रस्त शेतकऱ्यांच्या आर्थिक मदतीसाठी मुख्यमंत्री सहायता निधीला तब्बल ४३ लाख ९५ हजार रुपयाच्या धनादेश दिला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे विनयकुमार चौबे यांनी हा धनादेश सुपुर्द केला आहे. पिंपरी चिंचवड शहर पोलिसांनी अतिवृष्टी ग्रस्त शेतकऱ्यांना केलेल्या मदतीमुळे मराठवाड्यातील अतिवृष्टी ग्रस्त शेतकऱ्यांना आसमानी संकटातून सावरण्यास मोठा आधार मिळणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com