पिंपरी चिंचवड : सायबर गुन्हेगारांकडून फसवणुकीचे वेगवेगळे फंडे वापरले जात असतात. पिंपरी चिंचवडमध्ये आता नवीन फंडा समोर आला असून वेगवेगळ्या लोन ॲप वरून नागरिकांची हजारो रुपयांची आर्थिक फसवणूक करण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे. दरम्यान फसवणूक करणाऱ्या या आरोपीला पिंपरी- चिंचवड शहर पोलिसांच्या सायबर पोलिसांनी मुंबई येथून अटक केली आहे.
पिंपरी चिंचवडच्या सायबर पोलिसांनी इसाकी राजन थेवर असं लोन ॲपच्या माध्यमातून लोकांना आर्थिक गंडा घालणाऱ्या आरोपीचे नाव आहे. इसाकी राजन थेवर याने वेगवेगळे अँप डाउनलोड केले होते. यानंतर नागरिकांशी संपर्क साधून हे अँप डाऊनलोड करण्यास सांगत होता. अँप डाऊनलोड करताच संबंधित नागरिकांची फसवणूक करत असायचा. याबाबत फसवणूक झालेल्या नागरिकांनी पोलिसात तक्रार दिल्या होत्या.
चायनीज व्यक्तीच्या मदतीने फसवणूक
क्रेडिट कीपर, इन लोन क्रेडिट, न्यू लोन, लिगा लोन, फास्ट कॅश, हॅन्डीकॅश आणि इन्स्टंट लोन अशा प्रकारचे लोन देणारे अनधिकृत अँप आढळून आले आहेत. इसाकी राजन थेवर हा आरोपी आपल्या सिंगापूर येथील एका चायनीज व्यक्तीच्या मदतीने भारतात लोन देण्याचा गोरख धंदा चालवून नागरिकांची हजारो रुपयाची आर्थिक पिळवणूक करत असल्याचे पोलीस तपासात उघडकीस आला आहे.
१० हजाराहून अधिक नागरिकांची फसवणूक
दरम्यान पोलिसांनी या प्रकरणाची चौकशी करताना फसवणूक करणारा इसाकी राजन थेवर हा मुंबईत असल्याची माहिती मिळाली. यानंतर सायबर पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले आहे. तसेच यांच्या ताब्यातून सायबर पोलिसांनी एक मोबाईल फोन, पाच लॅपटॉप, सात सिम कार्ड, दोन डेबिट कार्ड असा मुद्देमाल जप्त केला आहे. थेवर आणि त्याच्या साथीदाराने मिळून आतापर्यंत देशभरातील जवळपास दहा हजार पेक्षा जास्त नागरिकांना फसवल्याचे पोलीस तपासात उघडकीस आला आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.