Pimpri Chinchwad : रक्तचंदनाची तस्करी; टोळीतील फरार दोन मुख्य आरोपी पोलिसांच्या ताब्यात

Pimpri Chinchwad News : २ मार्च २०२५ ला मालमत्ता विरोधी गुन्हे विभागाचे पोलीस पेट्रोलिंग करत असताना त्यांना पुणे- मुंबई एक्सप्रेस वे वर अवैधरीत्या रक्त चंदनाची वाहतूक करणारा एक कंटेनर आढळून आला होता.
Pimpri Chinchwad
Pimpri ChinchwadSaam tv
Published On

पिंपरी चिंचवड : रक्तचंदनाची मोठ्या प्रमाणात तस्करी करण्यात येत होती. यात साधारण जवळपास एक कोटी रुपयांच्या रक्त चंदनाच्या लाकडाची तस्करी करणाऱ्या टोळीचा पोलीस शोध घेत होते. या टोळीतील मुख्य आरोपीना पिंपरी चिंचवड शहर पोलिसांच्या मालमत्ता विरोधी गुन्हे विरोधी पोलीस पथकाने अखेर बेड्या ठोकल्या आहेत.

पिंपरी चिंचवड शहर पोलिसांच्या पथकाने राजेंद्र विठ्ठल शिंदे आणि कल्पेश सिंग या दोघांना ताब्यात घेतले आहे. दरम्यान २ मार्च २०२५ ला मालमत्ता विरोधी गुन्हे विभागाचे पोलीस पेट्रोलिंग करत असताना त्यांना पुणे- मुंबई एक्सप्रेस वे वर अवैधरीत्या रक्त चंदनाची वाहतूक करणारा एक कंटेनर आढळून आला होता. मात्र वाहतूक करणारे फरार झाले होते. तेव्हापासून रक्त चंदनाची तस्करी करणाऱ्या टोळीचा शोध पोलीस घेत होते.

Pimpri Chinchwad
Khandala Ghat : खंडाळा घाटात भीषण दुर्घटना; ट्रकवरील बांधलेले पाईप घसरले, कार व दुचाकीवर पडल्याने दोघांचा मृत्यू

दोघेजण होते फरार 

या प्रकरणात करण्यात आलेल्या तपासात मालमत्ता विरोधी गुन्हे पोलिसांनी आतापर्यंत एकूण सहा आरोपींना बेड्या ठकल्या होत्या. मात्र या प्रकरणातील मुख्य सूत्रधार राजेंद्र विठ्ठल शिंदे आणि कल्पेश सिंग हे पोलिसांना गुंगारा देत जवळपास चार महिन्यापासून फरार होते. तर पोलिसांनी मुंबई परिसरातून या दोन्ही आरोपींना आता बेड्या ठोकल्या आहेत. 

Pimpri Chinchwad
Ulhasnagar Crime : मिरची स्प्रे फवारत रिक्षा चालकाला बेदम मारहाण; उल्हासनगर रेल्वे स्थानक परिसरातील घटना

कार अडवत लूटमार 

पुणे : पुणे आहिल्यानगर महामार्गावर रांजणगाव गणपती परिसरात पहाटेच्या सुमारास प्रवाशी कार चालकाला सुटल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. दुचाकीवरुन आलेल्या तीन दरोडेखोरांनी एका कारला अडवून धारदार शस्त्राचा धाक दाखवत तब्बल १ लाख ७७ हजार रुपयांचे सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम लुटून नेल्याची धक्कादायक घडलीय. या प्रकरणी कार चालक अक्षय बोरगे यांच्या तक्रारीवरुन रांजणगाव एमआयडीसी पोलीसांत तीन अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com