कोल्हापूरात डिझेल पेट्रोल घोटाळा उघडकीस; पंपधारक पाेलिसांत

Petrol diesel
Petrol diesel
Published On

कोल्हापूर : कोल्हापूर येथे डिझेल आणि पेट्रोल Petrol diesel घोटाळा उघडकीस आला आहे. येथे गेल्या वर्षभरापासून हा धक्कादायक प्रकार सुरु हाेता. ताे उघडकीस आल्याने पंपधारकांनी पाेलिस ठाण्यात तक्रार करण्यासाठी पावलं उचलली आहेत.

मिरज येथील इंडियन ऑईलच्या डेपोतून येणाऱ्या कोल्हापुरात kolhapur येणाऱ्या डिझेल आणि पेट्रोलच्या टँकरमध्ये ऑर्डर दिलेल्या इंधनापेक्षा कमी इंधन येत आहे. गेल्या एक वर्षांपासून हा प्रकार घडत आहे. त्यामुळे पेट्रोल पंपधारकांचे मोठे आर्थिक नुकसान झालं आहे. कोल्हापूर येथील प्रवीण पेट्रोल पंपावर गुरुवारी आलेल्या डिझेलच्या टँकरमध्ये १५९ लिटर डिझेल कमी आल्याची माहिती मिळाल्यानंतर पंपधारकांनी याबाबत आवाज उठवला. आज (शुक्रवार) सकाळी इंडियन ऑईल पंपधारकांनी याबाबत चौकशी केली तर सर्वच पंपधारकांची हीच तक्रार असल्याचे समोर आले.

Petrol diesel
शौमिका महाडिक भूमिकेवर ठाम; 'गोकुळ'च्या सभासदांसाठी आज लढणार

डिझेलचा गाड्यांमधून येणाऱ्या तेलाची मोजणी करण्यासाठी वजन मापे विभागाने अधिकृत असलेला डीप राॅड deep rod दिलेला असतो. हा डीप राॅड बनावट बनवून याद्वारे पेट्रोल पंपधारकांची फसवणूक केल्याचे उघडकीस आले आहे. इंडियन ऑइल कंपनीचा indian oil पेट्रोलपंपांवर हा प्रकार निदर्शनास आला आहे.

गाड्यातील डिझेल मोजण्याच्या पट्टीत फेरफार केल्याचे आमच्या निदर्शनास आले आहे. आम्ही याबाबतची तक्रार पोलिसांत करणार आहाेत असे पंपचालक, मालकांनी सांगितले. याबाबत अरविंद तराळ, प्रदीप वेंगुर्लेकर यांनी या प्रकाराबाबत तीव्र नाराजी व्यक्त करुन यापुढे राज्यात काेणाचीच फसवणुक हाेऊ नये यासाठी तक्रार करुन कडक कारवाईची मागणी करणार असल्याचे सांगितले.

edited by : siddharth latkar

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com