Parola News : मध्यरात्रीच शेतकऱ्यांचा रस्ता रोको; लोडशेडिंग केल्याने महावितरण विरोधात उद्रेक

Parola News : मध्यरात्रीच शेतकऱ्यांचा रस्ता रोको; लोडशेडिंग केल्याने महावितरण विरोधात उद्रेक
Parola News
Parola NewsSaam tv
Published On

पारोळा (जळगाव) : पारोळा तालुक्यातील महामार्गावरील सावखेडा होळ येथे मध्यरात्री बारा ते दीडच्या (Parola) दरम्यान तीनशे ते साडेतीनशे शेतकऱ्यांनी (Farmer) महामार्गावर रस्ता रोको केला. परिसरात होत असलेल्या अघोषित भारनियमन होत असल्याने वीज वितरण उपकेंद्र येथे संताप व्यक्त करून उद्रेक केला. (Tajya Batmya)

Parola News
Ambarnath News: पालिका अधिकाऱ्यांना दिली चक्क हातगाडी भेट; मनसेचे अनोखे आंदोलन

शेतकऱ्यांना शेतीसाठी पाणी द्यायचे नियमन वीज मंडळाने करून दिले आहे. त्यानुसार मागील आठ दिवस हे रात्रीचे सावखेडे होळ व त्या परिसरातील शेतकऱ्यांना मिळाले होते. पुन्हा ३१ ऑगस्ट ते ५ सप्टेंबरपर्यंत रात्रीचे आवर्तन या परिसरातील शेतकऱ्यांना वीज मंडळांनी दिले होते. परंतु ३१ ऑगस्टच्या (Mahavitaran) रात्री मुंबई कळवा वीज वितरण केंद्रातून रात्री अकरा वाजता इमर्जन्सी लोड शेडिंग करावा. असे आदेश पारोळा १३२ उपकेंद्रास मिळाले. त्यानुसार सावखेडा फिडर लोड शेडिंग अंतर्गत बंद करण्यात आले. 

Parola News
Nanded ZP School: गतवर्षी बांधकाम झालेल्या शाळेचे छत कोसळले; विद्यार्थी गंभीर जखमी

शेतकरी उतरले रस्त्यावर 

वीज बंद झाल्यामुळे शेतकऱ्यांचा राग अनावर झाला आणि परिसरातील शेतकऱ्यांनी सावखेडा होळ वीज उपकेंद्र कार्यालय गाठले तेथे ठिय्या आंदोलन करून संताप व्यक्त केला. महामार्गावर रस्ता रोको केला हा रात्री बारा वाजेपासून दीड वाजेपर्यंत सुरू होता. मात्र घटनेची तीव्रता व माहिती मिळताच महावितरणचे सहाय्यक अभियंता गौतम मोरे घटनास्थळी पोहचले. शेतकऱ्यांच्या भावना लक्षात घेता रात्रीची आवर्तनाची वेळ बदलवून १ ते ४ तारखेपर्यंत सकाळी सव्वानऊ ते सायंकाळी सव्वा पाच वाजेपर्यंतच वीज वितरण केल्या जाईल असे आश्वासन दिले. 

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com