Crime News: 'बस का थांबवली नाही?' संतप्त प्रवाशांनी कंडक्टरचं डोकं फोडलं; पोलिसांकडून तपास सुरू

ST Bus Conductor Assaulted by Passengers: पुणतांबा फाटा येथे एसटी बस थांबवली नाही, या कारणावरून संतप्त प्रवाशांनी बसच्या कंडक्टरला मारहाण केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.
Ahilyanagar
AhilyanagarSaam
Published On

सचिन बनसोडे, साम टीव्ही

अहिल्यानगरच्या कोपरगावातून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. एसटी बस न थांबवल्याच्या कारणावरून प्रवाशांनी कंडक्टरला मारहाण केली आहे. या घटनेत कंडक्टरच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली असून, चार ते पाच प्रवाशांनी त्यांना दमबाजी करत मारहाण केली. या प्रकरणी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली असून, पोलिसांकडून तपास सुरू आहे.

कोपरगाव शहरातील पुणतांबा फाटा येथे एसटी बस न थांबवल्याच्या कारणावरून प्रवाशांनी कंडक्टरला मारहाण केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेत कंडक्टर कानिफनाथ जेजुरकर यांच्या डोक्याला दुखापत झाली असून, चार ते पाच प्रवाशांनी त्यांना दमबाजी करत मारहाण केली, अशी तक्रार पोलिसांकडे दाखल करण्यात आली आहे.

Ahilyanagar
Shocking: 'माझ्याकडे बघून तो हस्तमैथुन..' टेरेसवर तरूणाचे अश्लील चाळे, फोटो व्हायरल करत तरूणी म्हणाली..

ही घटना पुण्याहून येवला दिशेने जाणाऱ्या एसटी बसमध्ये घडली. याप्रकरणी बसमधील प्रवासी सतीश काकडे, बापू काकडे आणि इतर तीन अनोळखी व्यक्ती यांच्याविरोधात कोपरगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Ahilyanagar
Haribhau Bagade: जोधा अकबरची कहाणी खोटी, अकबरचं लग्न जोधाशी नव्हे तर.., राज्यपाल बागडेंचा मोठा दावा

तसेच, प्रवासी सतीश काकडे यांनीही प्रतिआरोप करत कंडक्टर जेजुरकर यांनी अरेरावीची भाषा वापरली आणि धक्काबुक्की केली, असा आरोप केला असून, त्यांनीही कंडक्टरविरोधात पोलिसात तक्रार दाखल केली आहे.सध्या कोपरगाव पोलीस दोन्ही बाजूंनी दाखल झालेल्या तक्रारींचा तपास करत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com