बीड : जिल्ह्यातील परळी विधानसभा मतदारसंघातील निवडणूक लक्षवेधी ठरत आहे. या ठिकाणी धनंजय मुंडे यांच्या विरोधात राजाभाऊ फड यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केलाय. आता त्यांच्या उमेदवारीमुळे गंगाखेडमध्ये विधानसभेच्या रिंगणात असलेले त्यांचे सासरे विद्यमान आमदार रत्नाकर गुट्टे यांना अडचणींचा सामना करावा लागतोय. परळीतील राजा फड यांची उमेदवारी मागे घ्यावी, तरच रत्नाकर गुट्टे यांना गंगाखेडमध्ये मदत होईल, असे मेसेज आता सोशल मीडियातून व्हायरल होत आहेत.
रत्नाकर गुट्टे यांचे जावई आणि त्यांच्या मर्जित असलेले राजाभाऊ फड यांनी परळी विधानसभेची शरद पवार गटाने उमेदवारी नाकारल्यानंतर अपक्ष उमेदवारी अर्ज भरला आहे. राजाभाऊ फड हे एकेकाळचे मुंडे प्रेमी व भाजप-रासपचे कार्यकर्ते होते. मात्र एकीकडे धनंजय मुंडे यांना मोठ्या नेत्यांकडून व्युहरचना करून टार्गेट केले जात असताना राजाभाऊ फड यांची उमेदवारी ही काही ओबीसी व त्यातल्या त्यात वंजारी समाजाच्या मतांचे विभाजन करणारी ठरू शकते.

परळीला लागूनच असलेल्या गंगाखेड मतदारसंघातील अनेक मुंडे प्रेमी सोशल मीडियावर पेटून उठले आहे. त्यांनी रत्नाकर गुट्टे यांच्यावर दबाव आणायला सुरुवात केली आहे. गुट्टे यांना दिवंगत भाजप नेते गोपीनाथराव मुंडे आणि आमदार पंकजा मुंडे यांचे कायम सहकार्य लाभल्याने ते तुरुंगात असताना सुद्धा मागच्या वेळी निवडून आले होते.
गंगाखेड मतदारसंघात निर्णायक मतदान हे ओबीसी समाजाचे असून, येथून डॉ. मधुसूदन केंद्रे, रत्नाकर गुट्टे असे आमदार विजयी झाले. ते मुंडे कुटुंबाला मानणाऱ्या मतदारांमुळेच, असं बोललं जातं. त्याचबरोबर गंगाखेडमध्ये मोठ्या प्रमाणावर मुंडे कुटुंबाला मानणारा वर्ग असून मुंडे कुटुंब म्हणतील त्याप्रमाणे इथल्या आमदारकीचे गणित ठरते, असेही मानले जाते. त्यामुळं आता सोशल मीडियातून प्रतिक्रिया उमटत आहेत.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.