Parbhani News: गंगाखेड तालुक्यातील मालेगावमध्ये झालेली कुस्ती स्पर्धा (Wresling) सध्या सर्वत्र चर्चेचा विषय ठरताना दिसत आहे. मालेवाडी गावात श्री दरलिंगेश्वर यात्रेनिमित्त २०० वर्षांपासून दरवर्षी कुस्ती स्पर्धचे आयोजित केल्या जातात. यावर्षीची स्पर्धा अतिशय वेगळ्या कारणाने कुस्ती स्पर्धा गाजली.
तालुक्यातील खोकलेवाडीतील मोनिका बिडगर या तरुणीने प्रथमच स्पर्धेत सहभाग नोंदवत प्रतिस्पर्धी पुरुष स्पर्धकावर मात करत विजय मिळवला. मोनिकाने यापूर्वी अनेक राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धेत सहभाग नोंदविलेला आहे. या कुस्ती स्पर्धेची सध्या तालुक्यामध्ये चांगलीच चर्चा होताना दिसत आहे. (Parbhani News)
याबाबत अधिक माहिती अशी की, सध्या मालेवाडी गावची वार्षिक यात्रा मोठ्या उत्साहात सुरू आहे. यात्रेनिमित्त गावात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. यात्रेनिमित्त गावामध्ये शुक्रवारी कुस्ती स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत २०० वर्ष न घडलेला एक अनोखा विक्रम घडला आहे.
तालुक्यातील खोकलेवाडीतील मोनिका बिडगर या तरुणीने यापूर्वी अनेक राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धांमध्ये सहभाग नोंदवलेला आहे. मात्र इथल्या स्पर्धेत प्रथमच सहभाग नोंदवत तिने पुरुष स्पर्धकावर विजय मिळवला.
या कुस्ती स्पर्धेची सध्या पंचक्रोशित चांगलीच चर्चा होताना दिसत आहे. कुस्तीपटू मोनिका बिडगर सध्या सर्वत्र कौतुकाचा विषय ठरत असून सोशल मीडियावर तिच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होताना दिसत आहे. खोकलवाडीसारख्या ग्रामीण भागातून आलेल्या मोनिका बिडगरने राज्यस्तरावर आपले कुस्ती नैपुण्य दाखवले. ही बाब ग्रामीण भागातील क्रीडा क्षेत्रासह विशेषतः महिला खेळाडूंसाठी निश्चितच प्रेरणादायी ठरावी अशी आशा व्यक्त केली जात आहे. (Latest Marathi News)
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.