MSRTC Bus: डिझेल संपले, बस जागेवरच उभ्‍या; प्रवाशी बसले प्रतिक्षेत

डिझेल संपले, बस जागेवरच उभ्‍या; प्रवाशी बसले प्रतिक्षेत
MSRTC Bus
MSRTC BusSaam tv
Published On

परभणी : जिल्‍ह्यात डिझेल अभावी विविध आगारांतून बसफेऱ्या रद्द करण्याची वेळ एसटी महामंडळावर (MSRTC) आली आहे. पाथरी आगारातून १३ बसफेऱ्या रद्द झाल्या आहेत. असाच प्रकार काही दिवसांपूर्वी पाथरी आगारातून (Selu) सेलू तालुक्यासाठी दिल्या जाणाऱ्या ६३ बसफेऱ्या रद्द कराव्या लागल्या. यामुळे प्रवाशांना गैरसोयीचा सामना करावा लागला. (Latest Marathi News)

MSRTC Bus
Chhatrapati Sambhaji Nagar Airport News : बायकोशी भांडण झाल्याने त्याने पाेलिसांना चक्क दिली विमानतळ उडविण्याची माहिती; बीडीडीएसच्या पथकाची धावपळ

राज्‍य परिवहन महामंडळाच्‍या प्रत्‍येक आगार बसस्‍थानकात पेट्रोल पंप आहे. तसेच काही खासगी डिझेल पंपावर देखील सुविधा केली आहे. अशात देखील डिझेलच्या (Diesel) तुटवड्यामुळे आगारावर पुन्हा बसफेऱ्या रद्द करण्याची वेळ आली आहे. एसटी महामंडळाला याचा आर्थिक फटका बसत असून ग्रामीण प्रवाशांची तारांबळ उडत आहे. आगारातून तालुक्यातील गावांसह लांबपल्ल्याच्या बस धावतात. दरम्यान डिझेल अभावी बसफेऱ्या रद्द करण्याची वेळ अनेकदा आगारावर येत आहे.

MSRTC Bus
Rahul Gandhi Meet Uddhav Thackeray: राहुल गांधी 'मातोश्री'वर येणार? संजय राऊत यांनी व्यक्त केली शक्यता

उत्‍पन्‍नावर मोठा परिणाम

बसफेऱ्या रद्द होत असल्‍याने महामंडळाच्या उत्पन्नावर देखील परिणाम होत आहे. तर दुसरीकडे प्रवाशांची गैरसोय होत आहे. प्रवाशांसाठी महामंडळाकडून एसटी आगारनिहाय बसफेऱ्या सोडण्यात येतात. मोठ्या प्रमाणात प्रवासी एसटीला प्राधान्य देत प्रवास करतात. शिवाय विद्यार्थ्यांनाही तालुक्याच्या ठिकाणी शिक्षणासाठी ये-जा करावी लागते. अशात गेल्या दहा ते बारा दिवसांपासून परभणी विभागातील विविध आगारांत डिझेल तुटवड्यामुळे बसफेऱ्या रद्द कराव्या लागत आहेत. दरम्यान पाथरी आगारात पुन्हा १५ बस रद्द कराव्या लागल्या. यामुळे पाच हजार किलोमीटर वाहतूक रद्द झाल्‍याने दीड लाखांचे आर्थिक नुकसान महामंडळाला सहन करावे लागले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com