मिट्ट काळोख आणि शेतात वासरे दावणीला; अचानक....

परभणीच्या जिंतूर तालुक्यातील परिसरातील दाभा येथे बिबट्याने दोन वासरांना ठार मारल्याची घटना घडली आहे.
Leopard attack
Leopard attack saam tv

Parbhani News : परभणीच्या जिंतूर तालुक्यातील परिसरातील दाभा येथे बिबट्याने दोन वासरांना ठार मारल्याची घटना घडली आहे. आज, मंगळवारी सकाळच्या सुमारास ही घटना उघडकीस आली आहे. जिंतूर तालुक्यातील परिसरातील दाभा येथील शेतशिवारात मध्यरात्रीच्या सुमारास एका बिबट्याने (Leopard) दोन शेतकऱ्यांच्या आठ ते नऊ महिन्याचा गाईच्या दोन वासरावर हल्ला करत चावा घेऊन ठार मारले आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

Leopard attack
Ahmednagar : अखेर 'त्या' बेपत्ता तरुणाच्या मृत्यूचं गूढ उकललं; पोलिसांनी ७ जणांना केली अटक

मिळालेल्या माहितीनुसार, जिंतूर तालुक्यातील इटली परिसरातील दाभा शेतशिवारात काल मध्यरात्रीच्या सुमारास दाभा येथील शेतकरी परमेश्वर माणिक गिरे व द्रौपदी विठ्ठल सदावर्ते या दोन शेतकऱ्यांच्या शेतात रात्री कोणीच नव्हते. आज सकाळी दोन्ही शेतकरी शेतात गेले असता त्याच्या झाडाला बांधलेल्या गाईच्या दोन वासराला बिबट्याने हल्ला करून चावा घेत ठार मारल्याचे दिसून आले. तसेच घटनास्थळावर बिबट्याच्या पायाचे जमिनीवर ठसे स्पष्ट दिसत होते, अशी माहिती दाभा येथील ग्रामस्थांच्या वतीने देण्यात आली असून घटनेची माहिती वन विभागाला दिली.

Leopard attack
Wardha: पुराच्या पाण्यात मनोरुग्ण व्यक्तीने घेतली उडी, ६ तास उलटलूनही अद्याप थांगपत्ता नाही

वन विभागातील वनपाल दुधारे यांनी गावात जाऊन शेत परिसरात असलेल्या घटनास्थळाचा पंचनामा केला आहे. यापूर्वी देखील वाघी (वडी)सर्कल व इतर परिसरात बिबट्याचे दर्शन घडले होते. तसेच अनेक जनावरे फस्त केल्याच्या घटना घडल्या होत्या. मात्र पुन्हा एकदा बिबट्याने दोन वासराना फस्त केल्याने या परिसरातील शेतकरी व ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. त्यामुळे वन विभागाने या बिबट्याचा त्वरित बंदोबस्त करावे. तसेच दोन शेतकऱ्यांचे जनावर खाल्ल्याने त्यांना आर्थिक मदत देण्यात यावी,अशी मागणी गावकऱ्यातून जोर धरत आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com