Crime News: पैश्याच्या वादातून मित्राने केला मित्राचा खून; थरारक घटना सीसीटीव्हीत कैद

पैश्याच्या वादातून मित्राने केला मित्राचा खून; थरारक घटना सीसीटीव्हीत कैद
Parbhani Crime News
Parbhani Crime NewsSaam tv
Published On: 

परभणी : परभणीच्या सेलु शहरात केवळ 500 रुपयांवरून वाद झाला. या वादातून मित्रानेच मित्राचा चाकूने गळा चिरून खून (Crime News) केल्याची घटना घडली आहे. सर्व घटना सीसीटीव्ही (CCTV) कॅमेरात कैद झाली आहे. (Live Marathi News)

Parbhani Crime News
Dhule News: महावितरणचा ग्राहकांना दिलासा; थकीत वीज बिलासाठी मुभा

सेलु (Selu) येथील संतोष आवटे, हेमंत गंडले हे दोन्‍ही मित्र आहेत. या दोघांमध्‍ये केवळ 500 रुपयांच्या देवाण घेवाणीच्‍या कारणावरून सकाळी वाद झाला होता. या वादात हेमंत गंडलेने संतोष आवटे यांच्या गळ्यावर चाकूने वार (Crime) करून जखमी केले. मात्र उपचाराला नेत असताना संतोष आवटे याचा मृत्यू झाला.

घटना सीसीटीव्हीत कैद

दोन्‍ही मित्रांमध्‍ये झालेला वाद व या वादातून चाकूने केलेल्‍या वाराची थरारक घटना सीसीटीव्हीत कॅमेरात कैद झाली आहे. पोलिसांनी आरोपी हेमंत गंडलेला याच सीसीटीव्ही कॅमेराच्‍या फुटेजच्‍या आधारे सेलु पोलिसांनी पंधरा मिनिटात अटक केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com