Ashashi wari : विठ्ठल भेटीची आस पुर्ण; परतताना बसमध्येच वारकऱ्याचा मृत्यू

विठ्ठल भेटीची आस पुर्ण; परतताना बसमध्येच वारकऱ्यांचा मृत्यू
Ashashi wari
Ashashi wariSaam tv
Published On

परभणी : आषाढी एकादशीला पंढरपूरला विठुरायाचे दर्शन घेतले. विठ्ठल भेटीची आस पुर्ण झाल्‍यानंतर वारकरी परतीच्‍या प्रवासाला लागले. (Pandharpur) पंढरपूर– अकोला या बसमधून परतत असताना (Akola) अकोला जिल्ह्यातील एका वारकऱ्याचा मृत्यू झाल्याची घटना परभणीच्या (Parbhani) गंगाखेड शहरात घडली आहे. (Latest Marathi News)

Ashashi wari
Ashadhi Wari: पंढरपूरच्या आषाढी वारीची जागतिक वारसा स्थळामध्ये होणार नोंद

आषाढीला विठ्ठलाचे दर्शन झाल्‍यानंतर अनेक भाविक पंढरपुरातून परतीच्‍या प्रवासाला लागले होते. यात अकोला जिल्‍ह्यातील वारकरी नरेंद्र आनंदराव कळणे हे पंढरपूर– अकोला बसने प्रवास करत होते. बस गंगाखेड शहरापासून जवळ असलेल्या धैर्य मंगल कार्यालयावर वारकऱ्यांना चहापाणी व नाश्ता फराळ करण्यासाठी रात्री एक वाजता थांबवण्यात आली होती.

Ashashi wari
Akola News: रेल्‍वे वॅगनवर चढून सेल्फी काढणे पडले महागात; अकोला रेल्वे स्थानकावरील घटना

बसमधून न उतरल्‍याने झाली चौकशी

दरम्‍यान अकोला येथील वारकरी नरेंद्र कळणे हे खाली न उतरल्यामुळे काही व्यक्तींनी त्यांना विचारपूस करण्यासाठी बसमध्ये (Ashadhi Ekadashi) चढले. यावेळी ते प्रतिसाद देत नसल्याने बस गंगाखेड उपजिल्हा रुग्णालयामध्ये घेण्यात आली. या ठिकाणी वैद्यकीय अधिकाऱ्यांनी वारकरी नरेंद्र आनंदराव कळणे यांना तपासून मृत घोषित केले. विठुरायाचे दर्शन करून परतताना वारकऱ्याचा मृत्यू झाला असल्याने हळहळ व्यक्त केली जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com