परभणी : राज्यात विधानसभा निवडणुकीचे सर्वत्र वारे वाहू लागले आहेत. राज्यभरातील विविध पक्षांच्या उमेदवारांकडून उमेदवार अर्ज भरण्यासाठी लगबग सुरु आहे. परभणीतही निवडणुकीची रणधुमाळी सुरु आहे. याचदरम्यान, एक मनोज जरांगे समर्थक बाळासाहेब काजळे यांनी उमेदवारी अर्ज भरताना निवडणूक अधिकाऱ्यांची डोकेदुखी वाढवली. बाळासाहेब काजळे यांनी अर्ज भरताना अनामत रक्कम भरण्यासाठी निवडणूक अधिकाऱ्यांना चक्क चिल्लर दिली. बाळासाहेब काजळे यांच्या कृत्याने अनेकांना 'गल्लीत गोंधळ, दिल्लीत मुजरा' सिनेमातील सीनच आठवला.
मनोज जरांगे समर्थक बाळासाहेब काजळे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. मराठा आरक्षणाच्या मुद्यावर मनोज जरांगे पाटील यांनी येत्या विधानसभेत इच्छुक उमेदवारी अर्ज दाखल करण्याचे ठरवले होते. त्यानुसार, जिंतूर सेलू विधानसभा उमेदवारी दाखल करताना अनामत रक्कम भरण्यासाठी चक्क मराठा समाजातील नागरिकांनी एक,दोन, पाच रुपयांची नाणी जमा करून दिली. ही नाणी मोजताना प्रशानाची डोकेदुखी वाढली होती.
मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण मिळावे, यासाठी मागील दीड वर्षांपासून मनोज जरांगे पाटील लढा देत आहेत. मात्र राज्यसरकारने मराठा आरक्षण दिले नसल्यामुळे येत्या विधानसभेत उमेदवार उभे करण्याचे ठरवले आहे. यासाठी आरक्षण चळवळीत काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना उमेदवारी अर्ज दाखल करण्याचे सांगितले होते. यासाठी जिंतूर तालुक्यात मराठा आरक्षण चळवळीत सक्रिय काम करणारे बाळासाहेब काजळे यांनी आज उमेदवारी अर्ज दाखल केला.
बाळासाहेब काजळे यांच्यासाठी समाजातील नागरिकांनी एक,दोन,पाच रुपयांची नाणी जमा केली होती. ही नाणी अनामत रक्कम म्हणून संबंधित उमेदवार काजळे यांनी जमा केली. यावेळी नाणी मोजण्यासाठी वेळ लागला असल्यामुळे प्रशासनाची डोकेदुखी वाढली होती. यावेळी केवळ एक हजार रुपयांची नाणी प्रशासनाने स्वीकारली. दरम्यान, यावेळी कार्यालयातील अनेकांना मकरंद अनासपुरे यांच्या गल्लीत गोंधळ दिल्लीत मुजरा या चित्रपटाची आठवण झाली.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.