Pandharpur Wari: पंढरपुरच्या वारीच्या मार्गात VIP ताफ्यांना नो एन्ट्री; सरकारचा निर्णय

No VIP Vehicles In Road Of Pandharpur Wari: पंढरपुरची वारी व्यवस्थित व्हावी, यासाठी शासनाने काही महत्त्वाचे निर्णय घेतले आहे. पंढरपुरच्या वारीच्या रस्त्यावर कोणत्याही व्हीआयपी वाहनांच्या ताफ्याला प्रवेश नाहीये.
Pandharpur Wari
Pandharpur WariSaam Tv
Published On

पंढरपुरच्या विठुरायाला भेटण्याचे वेध वारकऱ्यांना लागले आहेत. दरवर्षा लाखो लोक पायी वारी करतात. वारीला ऐतिहासिक वारसा लाभला आहे. त्याचसोबत शेकडो वर्षांची परंपरादेखील आहे. अनेकदा वारीला जाताना वारकऱ्यांना काही कारणामुळे त्रास सहन करावा लागतो. व्हिआयपी वाहनांचे ताफे जात असतात. त्यामुळे वारकऱ्यांना त्रास सहन करावा लागतो. आता त्याच पार्श्वभूमीवर शासनाने मोठा निर्णय घेतला आहे. शासनाने व्हिआयपी वाहनांना नो एन्ट्री केली आहे.

Pandharpur Wari
Pandharpur News: भीमेची पातळी वाढली; पात्रातल्या मंदिरात 3 महाराज अडकले, पाहा थरारक व्हिडिओ

यंदा वारी २६ जून ते १६ जुलै या कालावधीत होणार आहे. आषाढी वारीसाठी वारकऱ्यांच्या सोयीसुविधांसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेण्यात आली. यामध्ये अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले.

या बैठकीत घेण्यात आलेला महत्त्वाचा निर्णय म्हणजे वारीच्या मार्गात व्हिआयपी गाड्यांना नो एन्ट्री. अनेकदा व्हिआयपी वाहनांचा ताफा जातो त्यामुळे वारकऱ्यांना त्रास सहन करावा लागतो. यामुळे हा निर्णय घेतला आहे.

यंदा वारीसाठी जाणाऱ्या लोकांना टोलमध्ये सवलत, मानाच्या पालख्या, वारकऱ्यांन फिरती शौचालये, पाणी, मेडिकल सुविधा आणि पोलिस बंदोबस्तासाठी नियोजन करावे, असे निर्देश देण्यात आले आहेत.

Pandharpur Wari
Pandharpur Wari : चंद्रभागेच्या तिरी लाखो वारकरी, पंढरपुरात विठुरायाच्या दर्शनासाठी भाविकांची तुफान गर्दी, पाहा PHOTO

वारीच्या मुक्काच्या ठिकाणी पाण्याची सोय, विजेची जोडणी, तंबू उपलब्ध करुन देण्याचाही निर्णय घेण्यात आला आहे. यंदा वाखरी येथे मॉडेल वारीतळ विकसित केले जाणार आहे. रेल्वेच्या ६५ एकर जागेचा यासाठी समावेश केला आहे. यामुळे वारकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. याचसोबत अनेक ठिकाणी स्वागत मंडप टाकण्यात येणार आहे. लाउड स्पीकरवर बंदी घातली आहे. पालखीसोबत अनेक अॅम्ब्युलन्स, दर्शन पास, पाण्याची सोय, औषधांची व्यवस्था, शौचालये उभारण्याचे निर्देश देण्यात आली आहे. वारकऱ्यांना वारीत काहीही त्रास होऊ नये, याची काळजी घेतली जाणार आहे.

Pandharpur Wari
Vitthal Wari : विठुरायाची लंडन वारी; पालखी सोहळ्याचे प्रस्थान, ६५ दिवसांचा असणार प्रवास

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com