Shahaji Patil News : काँग्रेस आणि उद्धव ठाकरेंचे एक दिवस भांडे फुटणार; आमदार शहाजी पाटील यांची टीका

काॅंग्रेस आणि उध्दव‌ ठाकरे यांचे एक दिवस भांडे फुटणार; आमदार शहाजी पाटील
Shahaji Patil
Shahaji PatilSaam tv

पंढरपूर : उद्धव ठाकरे यांच्या सभेला होणाऱ्या गर्दी पाठीमागे काँग्रेस आणि राष्ट्रवादी माणसे पाठवण्याचे काम करत आहे. ही मतात रूपांतर होणारी गर्दी नव्हे. एक दिवशी (Congress) काॅंग्रेस आणि उध्दव‌ ठाकरे गटाचे भांडे फुटणार; अशी टिका सांगोल्याचे शिवसेनेचे (Shahaji Bapu Patil) आमदार शहाजी बापू पाटील यांनी केली आहे. (Breaking Marathi News)

Shahaji Patil
Kalyan News: दुकानातून तीन लाखांचे मोबाईल लंपास; चोरटा सीसीटिव्हीत कैद

काँग्रेस पक्षाची आधीपासूनच सावरकर यांच्याबद्दल कलूशित आहेत. त्यांच्यासोबत राहून उद्धव ठाकरे यांची ससेहालपटच होणार आहे. जर ठाकरेंना सावरकर यांच्याबद्दल प्रेम असेल, तर विरोधी विचार असणाऱ्या पक्षासोबत कसे राहतात. हीच हिंदुत्ववादी आणि बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांशी प्रतारणा आहे.

Shahaji Patil
Beed News: ३ लाखाच्या खंडणीसाठी कॉन्ट्रॅक्टरच्या मुलीचे अपहरण

कुठलाही अजेंडा नाही. काँग्रेस– राष्ट्रवादीकडून (NCP) पाठवलेली गर्दी त्यांच्या सभेत आहे. याचे मतात रूपांतर होणार नाही. एक दिवस भांडे फुटेल अशी टीका आमदार शहाजी बापू पाटील यांनी ठाकरेंवर केली आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com