Electric Shock : वीज जोडणी करताना घडले दुर्दैवी; विद्युत झटका बसल्याने कंत्राटी वायरमनचा मृत्यू

Pandharpur News : अतिश लांडे हा कॉन्ट्रॅक्ट बेसवर महावितरणमध्ये वायरमनचे काम करत होता. आज देखील तो नेहमीप्रमाणे कामावर आला होता. दरम्यान दुपारी मंगळवेढ्यात वीज पुरवठा खंडीत झाला होता
Electric Shock
Electric ShockSaam tv
Published On

पंढरपूर : विद्युत लाईनमध्ये बिघाड झाल्याने दुरुस्ती साठी वीज जोडणीचे काम करत असताना अचानक वीज पुरवठा सुरू झाला. यावेळी विद्युत खांबावर काम करण्यासाठी चढलेल्या एका खासगी वायरमनला विजेचा जोरदार झटका बसला. यात त्याचा जागीच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना आज दुपारी मंगळवेढ्यात घडली. या प्रकरणी नातेवाईकांनी महावितरणच्या चुकीमुळे घटना घडल्याचा आरोप केला आहे. 

पंढरपूरच्या मंगळवेढा येथे दुपारच्या सुमारास सदरची घटना घडली आहे. यात अतिश जयराम लांडे असे मृत्यू झालेल्या वायरमनचे नाव आहे. अतिश लांडे हा कॉन्ट्रॅक्ट बेसवर महावितरणमध्ये वायरमनचे काम करत होता. आज देखील तो नेहमीप्रमाणे कामावर आला होता. दरम्यान दुपारी मंगळवेढ्यात वीज पुरवठा खंडीत झाला होता. हा वीज पुरवठा सुरळीत करण्यासाठी दुरुस्तीचे काम महावितरणकडून हाती घेण्यात आले होते. 

Electric Shock
Jalna Partur News : दुरुस्तीच्या कामासाठी खांबावर चढला; विजेचा जोरदार झटका बसल्याने एकाचा मृत्यू

विजेचा झटका बसल्याने खाली फेकला गेला 

दरम्यान वीज जोडणी दुरूस्तीच्या कामासाठी अतिश हा विजेच्या खांबावर चढला होता. काम करताना ताराला स्पर्श होऊन विजेचा झटका बसल्याने तो खांबावरून खाली पडला. यात त्याचा जागीच मृत्यू झाला. दरम्यान सोबत असलेल्या कर्मचाऱ्यांनी त्याला रुग्णालयात नेले मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. घटना घडल्यानंतर गावातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. 

Electric Shock
Akola : अल्पभूधारक शेतकऱ्याने संपविले जीवन; २० हजार रुपयांच्या कर्जफेडीच्या विवंचनेत उचलले टोकाचे पाऊल

नातेवाईकांचे महावितरण कार्यालयासमोर आंदोलन 

दरम्यान वीज वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांनी वीज पुरवठा बंद केल्याची खातरजमा न करता अतिशला वीजेच्या खांबावर चढण्यास सांगितले. त्यामुळे अतीशचा मृत्यू झाल्याचा आरोप करत नातेवाईकांनी वीज वितरण कंपनीच्या कार्यालयासमोर आंदोलन केले. या प्रकरणी वीज वितरण कंपनीचे लाईनमन आणि संबंधित अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करून कारवाई करावी; अशी मागणी देखील नातेवाईकांनी केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com