पंढरपूर: अवैध गुटखा प्रकरणी पंढरपूर पोलिसांनी (Pandharpur) आज मोठी कारवाई केली आहे. कर्नाटकातून (Karnataka) अवैध मार्गाने महाराष्ट्रात विक्रीसाठी आणलेला ट्रकभर गुटखा पोलिसांनी पकडला असून या कारवाईमध्ये पोलिसांना सुमारे 36 लाख रूपयांचा गुटखा सापडला आहे.
शासनाने गुटखा बंदी केली असली तरी देखील अवैध मार्गाने गुटख्याची विक्री सुरु असते. मात्र, पोलिसांच्या सतर्कतेमुळे अनेकवेळा गुटखा विक्रेत्यांचा काळा धंदा उघडकीस येतो. अशीच एक मोठी कारवाई पंढरपूर (Pandharpur) पोलिसांनी केली.
पाहा व्हिडीओ -
कर्नाटकातून टेंभूर्णीकडे अवैध गुटखा घेवून जाणारा ट्रक पोलिसांनी अहिल्यादेवी पूलाजवळ आला असता गुन्हे प्रकटीकरण शाखेचे प्रमुख सी.व्ही केंद्रे यांनी मोठ्या शिताफीने पकडला. या ट्रकमध्ये तब्बल 36 लाख रूपयांचा अवैध गुटखा पोलिसांना आढळून आला.
या प्रकरणी पोलिसांनी एम एच ०९ सी ए ३६३० या क्रमांकाचा ट्रक जप्त केला असून ट्रक चालक प्रकाश रेवाप्पा शेजाळे राहणार भीमा तेलगाव, ता. दक्षिण सोलापूर, जिल्हा सोलापूर याला पोलिसांनी ताब्यात घेतल्याचं विक्रम कदम उपविभागीय पोलिस अधिकारी पंढरपूर यांनी सांगितलं.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.