विठ्ठल सहकारी साखर कारखान्यावर १८ वर्षांनंतर सत्तांतर; अभिजीत पाटील गटाची सत्ता

सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते भगीरथ भालके आणि कल्याणराव काळे यांच्या गटाचा दारुण पराभव झाला आहे.
Pandharpur Latest News
Pandharpur Latest NewsSaam Tv

पंढरपूर: पश्चिम महाराष्ट्राचे लक्ष लागलेल्या पंढरपूर येथील विठ्ठल सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीमध्ये (Election) सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) नेते भगीरथ भालके आणि कल्याणराव काळे यांच्या गटाचा दारुण पराभव झाला आहे. डीव्हीपी उद्योग समूहाचे अध्यक्ष अभिजीत पाटील गटाने या निवडणुकीमध्ये बाजी मारली आहे.

कारखान्याच्या सहा ऊस उत्पादक गटातून २००० मतांच्या आघाडीने वीस जागांवर विजय मिळवला. तर सत्ताधारी आघाडीला संस्था प्रतिनिधी मतदार संघातील एका जागेवर समाधान मानावे लागले आहे.

Pandharpur Latest News
Eknath Shinde: अपघातग्रस्त वारकऱ्यांच्या मदतीला 'एकनाथ' धावले; स्वखर्चाने करणार उपचार

राष्ट्रवादी काँग्रेसचे NCP) दिवंगत आमदार भारत भालके यांची गेल्या १८ वर्षापासून विठ्ठल कारखान्यावर सत्ता होती. त्यांच्या निधनानंतर त्यांचे पुत्र भगीरथ भालके हे कारखान्याचे अध्यक्ष झाले होते. अलीकडेच झालेल्या विधानसभा पोटनिवडणुकीमध्ये भगीरथ भालके यांना पराभवाला सामोरे जावे लागले होते.

त्यानंतर आता झालेल्या विठ्ठल सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीतही राष्ट्रवादीचे भगीरथ भालके आणि कल्याणराव काळे यांना पराभवाचा मोठा धक्का बसला आहे. कारखान्याचे संस्थापक औदुंबर पाटील यांचे नातू युवराज पाटील यांचाही या निवडणुकीत पराभव झाला आहे.

Pandharpur Latest News
शिवसेनेला मोठा धक्का! माजी खासदाराने नेतेपदाचा दिला राजीनामा

काल सकाळपासून मतमोजणी सुरू होती. सुरुवातीपासूनच अभिजीत पाटील गटाने भालके काळे व युवराज पाटील गटावर आघाडी घेतली होती. रात्रभर मतमोजणी झाल्यानंतर आज सकाळी निवडणुकीचे (Election) कल स्पष्ट झाले आहेत. यामध्ये कारखान्याच्या सहा ऊस उत्पादक गटातून जवळपास दोन हजार मतांची आघाडी घेत विजय पाटील गटाने विजय मिळवला आहे. या निवडणुकीमुळे पंढरपूर तालुक्याच्या राजकारणाला वेगळी कलाटणी मिळणार आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com