Prashant Paricharak: देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यक्रमाला दांडी, प्रशांत परिचारक तुतारी फुंकणार?

Devendra Fadnavis : पंढरपूरमध्ये भाजपला मोठा धक्का बसू शकतो. पंढरपूरमध्ये भाजपचे माझी आमदार प्रशांत परिचारक शरद पवार गटाच्या वाटेवर असल्याची चर्चा आहे.
देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यक्रमाला दांडी, प्रशांत परिचारक तुतारी फुंकणार?
Prashant Paricharak and Devendra FadnavisSaam Tv
Published On

पंढरपूरचे भाजपचे माजी आमदार प्रशांत परिचारक यांनी आज मंगळवेढा येथे झालेल्या उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यक्रमाला दांडी मारली. यामुळेच आता परिचारक लवकरच तुतारी हाती घेणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे. परिचारकांच्या या भूमिकेमुळे महायुतीला मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज मंगळवेढ्यात विविध विकास कामांचा प्रारंभ व शेतकरी मेळाव्याचे आयोजन केले होते. या कार्यक्रमाचे आयोजन भाजपचे आमदार समाधान आवताडे यांनी केले होते.

देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यक्रमाला दांडी, प्रशांत परिचारक तुतारी फुंकणार?
Maharashtra Politics: शरद पवारांचं 'मिशन फलटण', दादांना टेंशन; पक्षप्रवेशासाठी महिनाभराच्या तारखा बूक, 'हे' नेते तुतारी फुंकणार

मागील काही दिवसांपासून माजी आमदार प्रशांत परिचारक व आमदार समाधान आवताडे यांच्यामध्ये राजकीय दरी निर्माण झाली आहे. त्यातूनच परिचारक यांनी या कार्यक्रमाला दांडी मारल्याची चर्चा आहे.

देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यक्रमाला दांडी, प्रशांत परिचारक तुतारी फुंकणार?
Maharashtra Politics: कोल्हापूरनंतर शरद पवार सोलापूर मोहिमेवर! भाजप, शिंदे - अजित पवार गटाचे 'हे' नेते फुंकणार तुतारी?

मागील काही दिवसांपासून परिचारक हे भाजपामध्ये नाराज आहेत. पंढरपूर मधून भाजपाचे विद्यमान आमदार समाधान आवताडे यांना भाजपची उमेदवारी मिळणार हे जवळपास निश्चित असल्याने परिचारक राष्ट्रवादी काँग्रेसचे चंद्रपूर पक्षाची तुतारी हाती घेणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे. येत्या दोन दिवसात कार्यकर्त्यांची बैठक घेऊन परिचारक आपली भूमिका स्पष्ट करणार असल्याची माहिती आता समोर आली आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com