
महाराष्ट्रातील पाचगणी हिल स्टेशनवरील एका हॉटेलमध्ये सुरू असलेल्या डान्सबारवर मंगळवारी रात्री छापा टाकण्यात आला. पोलिसांनी एकूण ३२ जणांना अटक केली असून, त्यांच्यावर पाचगणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यांच्याकडून ध्वनिक्षेपक यंत्रणा, माईक, मोबाईल फोन आणि कार असा २५ लाख ४५ हजारांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे.
एका पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले की, साताराच्या भिलार येथील हिराबागमध्ये डान्सबारमध्ये छापा टाकण्यात आला. या हॉटेलच्या मालकाला देखील अटक करण्यात आली आहे. गायिकांच्या आणि महिला वेटरच्या नावाखाली बारबाला आणल्या जातात. त्यांना संगीताच्या तालावर कमी कपड्यात नृत्य करण्यास भाग पाडले जातात. याची माहिती पाचगणी पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक दिलीप पवार यांना मिळाली होती. त्यानुसार, पोलीस निरीक्षकांनी विशेष पथक घेऊन हॉटेलवर छापा टाकला.
या ठिकाणाहून १२ बारबालासह, हॉटेल मालक आणि इतर २० जणांना ताब्यात घेण्यात आलं आहे. तसेच त्यांच्याकडून २५ लाखांहून अधिक मु्द्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. या महिलांना डान्सबारमध्ये नेमकं कुठून आणले? याचा तपास पोलीस करीत आहेत. तसेच अनेक महिलांना समुपदेशनानंतर नातेवाईकांच्या ताब्यात येणार आहे. या प्रकरणी संशयितांवर महाराष्ट्र हॉटेल आणि मद्यपान कक्षमधील अश्लील नृत्यावर प्रतिबंध तसेच दारूबंदी अधिनियमाप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पाचगणी पोलिसांचे पथक या प्रकरणाचा सखोल तपास करीत आहेत.
हॉटेलवर कारवाई सहायक पोलीस निरीक्षक दिलीप पवार यांच्या मार्गदर्शनाखाली, पोलीस उपनिरीक्षक बालाजी सोनुने, सहायक फौजदार रवींद्र कदम, हवालदार कैलास रसाळ, श्रीकांत कांबळे, सचिन बोराटे, विनोद पवार, पोलीस नाईक तानाजी शिंदे, कॉन्स्टेबल उमेश लोखंडे, रेखा तांबे, सुमित मोहिते यांनी केली आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.