Palghar News: पाण्यासाठी महिलांचा हांडा मोर्चा; पायपीट थांबवण्यासाठी थेट पंचायत समितीत मुक्काम

Womens Handa Morcha: पालघर जिल्ह्यात दिवसेंदिवस पाण्याची समस्या बिकट होत आहे. त्यामुळं वाडा तालुक्यातील महिलांनी थेट पंचायत समितीवर हांडा मोर्चा नेत रात्रभर तिथे मुक्काम केला.
Palghar News
Palghar NewsSaam Tv
Published On

फय्याज शेख

Palghar Wada Taluka Water Crisis

पालघर (Palghar) जिल्ह्यात अनेक ठिकाणी पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. अशा परिस्थितीत दुष्काळ उपाययोजना अद्यापही आखल्या नसल्याचं दिसून येत आहे. अनेक गावांत पिण्याच्या पाण्याची समस्या निर्माण झालीय. वाडा तालुक्यातील पाड्यावरील महिलांना पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. (Latest Marathi News)

मागणी करूनही टँकर सुरू होत नसल्यां महिलांनी थेट पंचायत समिती कार्यालयावर हांडा मोर्चा काढला. त्यांनी प्रशासनाचं लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला आहे. या मोर्चामध्ये मोठ्या प्रमाणावर महिला सहभागी झाल्या (Water Crisis) होत्या. हिलांनी थेट पंचायत समितीवर हांडा मोर्चा नेत रात्रभर तिथे मुक्काम केल्याचं समोर आलं आहे.

 ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

पंचायत समितीवर हांडा मोर्चा

पाण्याच्या मागणीसाठी महिला पंचायत समितीत रात्रभर थांबल्या आहेत. जोपर्यंत आदिवासी पाड्यातील लोकांना टॅक्करने पाणी पुरवठा केला जात नाही, तोपर्यंत वाडा पंचायत समितीतून हलणार नाही, असा ठाम निर्धार या महिलांनी केलेला (Palghar Wada taluka Water Crisis) आहे. काल ( ४ मार्च) दुपारनंतर सुरू केलेला हांडा मोर्चा रात्रभर पंचायत समितीत आहे.

महिलांनी आता पिण्याच्या पाण्यासाठी थेट पंचायत समितीतच (Panchayat Samiti) मुक्काम ठोकला आहे. त्यांनी टॅंकर सुरू केले जावे म्हणून हांडा मोर्चा काढला होता. परंतु त्यांच्या मागणीकडे दुर्लक्ष झाल्यामुळं आता त्यांनी टोकाचा निर्णय घेतला आहे.

Palghar News
Kalyan Water Crisis: डोंबिवलीकरांसाठी खुशखबर! एमआयडीसीला पाणी पुरवठा प्रेशर वाढविण्याचे आदेश

शासनाला जाग येईल का?

पालघर जिल्ह्यातील वाडा तालुक्यातील घोडसाखर, फणसपाडा या पाड्यांसह सात पाड्यातील महीलांना पाण्यासाठी वणवण (Water Shortage) भटकावं लागतं. या समस्येवर तोडगा म्हणून पाण्याचे टॅंकर सुरू करावे, अशी मागणी या महिलांनी केली (Womens Handa Morcha) होती. मात्र, या मागणीकडे दुर्लक्ष केल्याने अखेर या पाड्यातील महीलांनी वाडा पंचायत समितीवर हांडा मोर्चा काढला होता.

जोपर्यंत टॅंकरने पाणी पुरवठा सुरू केला जात नाही, तोपर्यंत हांडा मोर्चा मागे घेणार नाही असा ठाम निर्धार या महिलांनी केला होता. मात्र मागणी मान्य न झाल्यामुळं अखेर या पाड्यातील महीलांनी संपूर्ण रात्र पंचायत समितीत (Water Issue) काढली. आता तरी शासनाला जाग येईल का? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

Palghar News
Pune Water Supply: पुणेकरांवर पाणी कपातीची टांगती तलवार; बुधवारी 'या' भागातील पाणीपुरवठा राहणार बंद

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com