Palghar News: गणपती बाप्पाचं विसर्जन करण्यासाठी गेले अन् अनर्थ घडला; पालघरमध्ये 3 गणेशभक्त बुडाले

Ganeshotsav News : गणपती विसर्जन करताना दोघांचा नाल्यात तर एकाचा तलावात बुडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना बुधवारी (20 सप्टेंबर)सायंकाळी वाडा तालुक्यात घडली.
Palghar News
Palghar NewsSaam Tv

Wada News : दीड दिवसांच्या गणपतीचे काल विसर्जन करण्यात आले. गणपती विसर्जन करताना दोघांचा नाल्यात तर एकाचा तलावात बुडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना बुधवारी (20 सप्टेंबर)सायंकाळी वाडा तालुक्यात घडली. या घटनेने आजूबाजूच्या परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

पालघर जिल्ह्यातील वाडा येथे दीड दिवसाचे गणपतींचे विसर्जन करण्यास गेले असता जगत नारायण मौर्य( वय 38), सुरज नंदलाल प्रजापती (25) हे कोनसाई येथे नाल्यात पडले. तर प्रकाश नारायण ठाकरे (वय 35) यांचा गोऱ्हे येथील तलावात पडून मृत्यू झाला आहे.

Palghar News
Maharashtra Rain: बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा; राज्यात मुसळधार पाऊस कोसळणार, 'या' जिल्ह्यांना अलर्ट

मिळालेल्या माहितीनुसार, बुधवारी सायंकाळी दीड दिवसांचे गणपती विसर्जन करण्यास गेले असता पाण्याच्या पातळीचा अंदाज न आल्याने कोनसई येथील नाल्यात दोघे जण पडले तर गोऱ्हे येथील तलावात बूडून एकाचा मृत्यू झाला. या घटनेने परिसरातस दुः खाचे वातावरण पसरले आहे.

सध्या गणेशोत्सवाचा उत्साह सगळीकडे पाहायला मिळत आहे. अशातच या घटनेने ऐन गणेशोत्सवाला गाळबोट लागलं आहे. लोकांमध्ये गणपतीचे आगमन झाल्याने उत्साहाचे वातावरण आहे. या उत्साहाच्या भरात पाण्याच्या खोलीचा अंदाज न आल्याने ही दुः खद घटना बुधवारी सांयकाळी घडली. त्यामुळे अशा घटना होऊ नये यासाठी पोलिसांकडून काळजी घेण्याचे आव्हान करण्यात येत आहे.

Palghar News
Onion Traders Strike: नाशिक जिल्ह्यात कांद्याचा प्रश्न पेटला; लिलावात सहभागी न होणाऱ्या व्यापाऱ्यांवर होणार कारवाई

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com