Palghar News: बोईसरमधील घरामध्ये भीषण स्फोट, चौघे गंभीर जखमी; नेमकं काय घडलं?

Palghar Massive Explosion At House: बोईसरच्या अवधनगर परिसरातील एका घरात रात्री हा भीषण स्फोट झाला. या स्फोटामुळे परिसरामध्ये खळबळ उडाली आहे.
Palghar News: बोईसरमधील घरामध्ये भीषण स्फोट, चौघे गंभीर जखमी; नेमकं काय घडलं?
Palghar Blast Saam Tv
Published On

रुपेश पाटील, पालघर

पालघरमधील एका घरामध्ये भीषण स्फोट झाल्याची घटना समोर आली आहे. या स्फोटामध्ये चार जण गंभीर जखमी झाले आहेत. बोईसरच्या अवधनगर परिसरातील एका घरात मध्यरात्री हा भीषण स्फोट झाला. या स्फोटामुळे परिसरामध्ये खळबळ उडाली आहे.

कपाटामध्ये स्फोट झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. या घरामध्ये राहणारे ४ जण गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत. हा स्फोट इतका भीषण होता की घरातील कपाटासह काही वस्तू पूर्णपणे तुटल्या आहेत. घरातील भिंतीचा काही भाग ही कोसळला आहे. या स्फोटाचे कारण अस्पष्ट आहे. बोईसर पोलिसांकडून या स्फोटाचा तपास सुरू आहे

मिळालेल्या माहितीनुसार, बोईसरच्या अवधनगर परिसरात मध्यरात्रीच्या सुमारास एका घरात भीषण स्फोट झाल्याची घटना घडली. हा स्फोट इतका भीषण होता की घरातील कपाटासह इतर वस्तूंचे मोठे नुकसान झाले. कपाटाच्या काचा पूर्णपणे फुटल्या असून घरा समोरच्या भिंतीचा काही भागही कोसळला. तर बाजूच्या घरांच्या भिंतींना देखील तडे गेले असल्याची माहिती समोर आली आहे.

Palghar News: बोईसरमधील घरामध्ये भीषण स्फोट, चौघे गंभीर जखमी; नेमकं काय घडलं?
Palghar Crime : सराफ व्यावसायिकाकडून ७९ महिलांची फसवणूक; सव्वा कोटीचे दागिने घेऊन पसार, राजस्थानमधून घेतले ताब्यात

या स्फोटात कुठलीही जीवितहानी झाली नसली तरी स्फोटामध्ये एकूण चार जण गंभीर जखमी झाल्याची प्राथमिक माहिती पोलिस प्रशासनाकडून देण्यात आली आहे. स्फोटाचे कारण अस्पष्ट असलं तरी घटना घडल्यानंतर तात्काळ बोईसर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पाहणी केआली. नेमका स्फोट कशामुळे झाला याचा तपास सध्या बोईसर पोलिसांकडून सुरू आहे.

Palghar News: बोईसरमधील घरामध्ये भीषण स्फोट, चौघे गंभीर जखमी; नेमकं काय घडलं?
Palghar Crime: पालघर हादरलं! माय-लेकीला संपवलं, मृतदेह दगडाला बांधून नाल्यात फेकला, दीर-नणंद निघाले मारेकरी

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com