Palghar Crime News: पत्नीसोबत अनैतिक संबंधांचा संशय, काकाने पुतण्यासोबत केले भयंकर कृत्य; परिसरात खळबळ

Crime News Update: धक्कादायक घटनेने परिसरात खळबळ माजली असून या प्रकरणी आरोपी काकाला पोलिसांकडून अटक करण्यात आली आहे.
Palghar Crime News
Palghar Crime Newssaam tv
Published On

Palghar News: पत्नीसोबत अनैतिक संबंध असल्याचा संशय मनात धरून चुलत काकाने आपल्या पुतण्याची चाकूने वार करून हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. पालघर मधील वाणगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत हा प्रकार घडला असून अतुल विलास तांडेल असं 23 वर्षीय मृत पुतण्याचे नाव आहे. या प्रकरणी आरोपी काकाला पोलिसांकडून अटक करण्यात आली आहे. (Palghar Crime News)

Palghar Crime News
Anil Antony Joins BJP: काँग्रेसच्या दिग्गज नेत्याचा मुलगा भाजपमध्ये; PM मोदींचा उल्लेख करत जबाबदारी आणि कर्तव्येही सांगितली

याबाबत समोर आलेल्या माहितीनुसार, आरोपी दिनेश हरिश्चंद्र तांडेल याला आपल्या पत्नीचे पुतण्यासोबत अनैतिक संबंध असल्याचा संशय होता. याच संशयातून आरोपी काकाने पुतण्या आपल्या घरात हॉलमध्ये झोपला असताना घरात जाऊन त्याच्या पोटात धारदार चाकूने वार केले. यामध्ये अतूल विलास तांडेल याचा जाग्यावर मृत्यू झाला.

या संदर्भात वाणगाव पोलीस ठाण्यात 302 प्रमाणे गुन्हा दाखल झाला. वाणगाव पोलिसांनी तपास चक्रे फिरवत अवघ्या काही तासांमध्ये शोध मोहीम राबवून आरोपीला अटक केली आहे. या धक्कादायक घटनेने परिसरात खळबळ माजली आहे. या संदर्भात वानगाव पोलिसांकडून अधिक तपास सुरू आहे.

Palghar Crime News
Jalgaon News: धक्कादायक..एकमेकांना मिठी मारत पती– पत्‍नीसह मुलाने घेतले विषारी औषध; पतीचा मृत्यू

दरम्यान, आजच्या दिवसातील भीषण हत्येची ही दुसरी घटना समोर आली आहे. पुण्यातील कोंढवा (Kondhwa) परिसरात चुलत दिरानेच चारित्राच्या संशयातून आपल्या वहिनीसह दोन चिमुकल्या पुतण्यांना जिवंत जाळल्याचा प्रकार समोर आला होता. ज्यामुळे संपूर्ण पुणे शहरात खळबळ माजली होती. (Latest Marathi News)

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com