Accident: पालघरमध्ये मध्यरात्री अपघाताचा थरार, रुग्णवाहिकेने तिघांना चिरडलं; दोघांचा जागीच मृत्यू
Palghar Accident Saam Tv

Accident: पालघरमध्ये मध्यरात्री अपघाताचा थरार, रुग्णवाहिकेने तिघांना चिरडलं; दोघांचा जागीच मृत्यू

Palghar Accident: पालघरमध्ये भयंकर रस्ते अपघातामध्ये दोघांचा मृत्यू तर एक जण गंभीर जखमी झाला आहे. जव्हार मोखाडा- नाशिक महामार्गावर ही घटना घडली. भरधाव रुग्णवाहिकेने दुचाकीला धडक दिली.
Published on

Summary -

  • पालघरच्या जव्हारमध्ये रुग्णवाहिकेची दुचाकीला धडक

  • अपघातात दोघांचा जागीच मृत्यू तर एक गंभीर जखमी

  • चालक दारूच्या नशेत असल्याचे तपासातून समोर

  • जखमी व्यक्तीवर रुग्णालयात उपचार सुरू

फैय्याज शेख, पालघर

पालघरच्या जव्हारमध्ये भयंकर अपघाताची घटना घडली. भरधाव रुग्णवाहिके दुचाकीला धडक देत तिघांना चिरडलं. या अपघातामध्ये दोघांचा जागीच मृत्यू झाला तर एकाची प्रकृती गंभीर आहे. जखमी झालेल्या व्यक्तीला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्याची प्रकृती चिंताजनक आहे. रुग्णवाहिका चालक दारूच्या नशेत होता. अपघातानंतर रुग्णवाहिका चालक फरार झाला असून पोलिस त्याचा शोध घेत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पालघर जिल्ह्यातील जव्हार तालुक्यातील जव्हार रूग्णालयातून एका रुग्णाला पुढील उपचारासाठी नाशिक येथे पाठवण्यात आले होते. या रुग्णाला नाशिकला रुग्णवाहिकेतून नेले जात होते. या रुग्णवाहिकेचा चालक दारुच्या नशेत होता. जव्हार रूग्णालयातून नाशिकच्या दिशेने जात असताना चालक रग्णवाहिका वेगाने चालवत होता. त्यामुळे भयंकर अपघात झाला.

Accident: पालघरमध्ये मध्यरात्री अपघाताचा थरार, रुग्णवाहिकेने तिघांना चिरडलं; दोघांचा जागीच मृत्यू
Best Bus Accident : बेस्ट बसला भीषण अपघात; पुढच्या भागाचा चक्काचूर, ब्रिजवर नेमकं काय घडलं?

जव्हार मोखाडा- नाशिक महामार्गावर रुग्णवाहिकेने दुचाकीला पाठीमागून जोरदार धडक दिली. मोखाडा पोलिस ठाण्याच्या हद्दीत निलमाती येथे ही घटना घडली. दुचाकीवरून प्रवास करणारे तिघेही रस्त्यावर पडले. त्यानंतर रुग्णवाहिका चालकाने तिथेच थांबवण्याऐवजी तिघांनाही चाकाखाली चिरडले. या अपघातामध्ये दोघांनी जागीच प्राण सोडले. तर एक जण गंभीर जखमी झाला.

Accident: पालघरमध्ये मध्यरात्री अपघाताचा थरार, रुग्णवाहिकेने तिघांना चिरडलं; दोघांचा जागीच मृत्यू
Mumbai Shocking Accident : हृदयद्रावक! फिरायला गेली अन् परत आलीच नाही, आई - वडिलांसमोर दुचाकीस्वाराने दीड वर्षाच्या मुलीला चिरडलं

या अपघाताची माहिती मिळताच मोखाडा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी जखमी झालेल्या व्यक्तीला उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. तर मृत्यू झालेल्या दोघांचे मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवले. या अपघातामुळे परिसरात एकच खळबळ उडाली. या घटनेमुळे रुग्णवाहिकेत असलेल्या रुग्णाचे हाल झाले. अशा नशेबाज रुग्णवाहिका चालाकाविरोधात कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी केली जात आहे. सध्या मोखाडा पोलिस तपास करत आहेत.

Accident: पालघरमध्ये मध्यरात्री अपघाताचा थरार, रुग्णवाहिकेने तिघांना चिरडलं; दोघांचा जागीच मृत्यू
Mumbai Accident News : मुंबई- पुणे एक्स्प्रेस वेवर अपघाताचा थरार, चालकाला डुकली लागली अन् नियंत्रण सुटलं; कारने ५ जणांना चिरडलं

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com