पंढरपूर : कोरोनामुळे (Corona) गेल्या दोन वर्षांपासून बंद असलेले विठ्ठल-रुक्मिणीचे (Vitthal-Rukmini) पदस्पर्श दर्शन गुढीपाडव्यापासून सुरू होणार आहे. यासंदर्भात आज उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) आणि मंदिर समितीचे अध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांच्यामध्ये बैठक पार पडली या बैठकीमध्ये पदस्पर्श दर्शन सुरू करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे.
या निर्णयामुळे विठ्ठल भक्तांना थेट गाभार्यात जाऊन देवाचे दर्शन घेता येणार आहे. कोरोनामुळे पंढरपूरातील (Pandharpur) विठ्ठल मंदिरात २० मार्च २०२० पासून विठुरायाचे पदस्पर्श दर्शन बंद होते. त्यानंतर गेल्या वर्षी पासून मुखदर्शन सुरू करण्यात आले होते.
कोरोनाचा (Corona) प्रादुर्भाव कमी झाल्यानंतर विठुरायाचे पदस्पर्श दर्शन सुरू करावी अशी वारकऱ्यांची मागणी होती दोन दिवसापूर्वीच मंदिर समितीच्या बैठकीमध्ये ही पदस्पर्श दर्शन सुरू करण्यासंदर्भात ठराव करून तो शासनाकडे मंजुरीसाठी पाठविण्यात आला होता त्यावर आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सकारात्मक निर्णय घेत विठुरायाचे पदस्पर्श दर्शन सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे या निर्णयामुळे भाविकांमध्ये आनंद व्यक्त केला जात आहे.
Edited By - Jagdish Patil
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.