मुंबई : मुंबई बँक (Mumbai Bank Scam) फसवणूक प्रकरणी भाजप नेते प्रवीण दरेकर (Pravin Darekar) यांच्यावर कारवाई सुरू करण्यात आली आहे त्या आप महाराष्ट्र राज्य सचिव धनंजय शिंदे यांनी आज पत्रकार परिषेद घेत दरेकरांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. तर अजित पवार (Ajit Pawar) आणि प्रवीण दरेकर आधीपासूनच म्हणजे 2012 पासूनच मुंबई बँक लुटत आहेत असा गंभीर आरोप प्रीती मेनन यांनी केला आहे.
ते म्हणाले, 2015 ते 20189-20 मध्ये सहकार खात्यानं ऑडिट रिपोर्टमध्ये सांगितलं आहे की 2 हजार कोटींचा घोटाळा झाला आहे. नाबार्डनं देखील तसा उल्लेख केला आहे. ह्या संपूर्ण प्रकरणाची चौकशी लागली आहे 3 जानेवारीला ते मजूर म्हणून अपात्र झाले आहेत. आत्ताचे राष्ट्रवादीचे (NCP) सहकार मंत्री असहकार मंत्री आहेत.
400 संस्था बोगस आहेत, म्हणजे मतदार देखील बोगस आहेत. ही निवडणूक बोगस आहे असा आमचा आरोप, त्यासाठी आम्ही रिट दाखल केलेली आहे. ह्या माणसाच्या कालखंडात भ्रष्टाचार होऊन हे सरकार झोपा काढत होतं का? महाविकास आघाडी प्रवीण दरेकरांना वाचवतंय सर्व पक्षीय लोकांचा ह्या सर्वात समावेश आहे. प्रवीण दरेकरांच्या टोळीवर कारवाई झाली पाहिजे. दरोडेखोर प्रवीण दरेकर आम्हाला विरोधी पक्ष नेता नकोत असं म्हणत त्यांनी दरेकरांवर हल्लाबोल केला आहे.
हे देखील पहा -
दरम्यान, देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) भ्रष्ट लोकांना शोधून भाजपात प्रवेश करवतात. उद्धव ठाकरे जर मुंबईकर आहेत तर त्यांना मुंबईचे प्रश्न दिसत नाही आहे का असा सवाल आप राष्ट्रीय कार्यकारिणीच्या सदस्य व मुंबई प्रभारी प्रीती मेनन-शर्मा यांनी या पत्रकार परिषदेत केला.
राईट ऑफ करणाऱ्यांची प्रॉपर्टी जप्त केली पाहिजे सामान्यांचे पैसे जातायत प्रवीण दरेकरांनी पदावरुन पायउतार व्हावं फडणवीस आणि माजी सहकार मंत्र्यांचा देखील गुन्ह्यात सहभाग कोर्टाच्या अधिपत्याखाली एसआयटी स्थापन करत तपास करण्यात यावा तसंच अजित पवार आणि प्रवीण दरेकर आधीपासूनच म्हणजे 2012 पासूनच मुंबई बँक लुटत आहेत असा गंभीर आरोप प्रीती मेनन यांनी केला.
Edited By - Jagdish Patil
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.