जिल्हा बँकेच्या डायरीतून पडळकर गायब; राष्ट्रवादीला माझ्या नावाचं पित्त पडळकरांची टीका

'ही बँक राष्ट्रवादीच्या (NCP) ताब्यात आहे आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांना माझ्या नावाचे पित्त आहे. यामुळे ते यापेक्षा वेगळे काही करुच शकत नाहीत.'
जिल्हा बँकेच्या डायरीतून पडळकर गायब; राष्ट्रवादीला माझ्या नावाचं पित्त पडळकरांची टीका
जिल्हा बँकेच्या डायरीतून पडळकर गायब; राष्ट्रवादीला माझ्या नावाचं पित्त पडळकरांची टीकाSaam TV
Published On

सांगली :- सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या नवीन वर्ष 2022 ची नवीन डायरी नुकतीच प्रकाशित केली आहे मात्र या डायरीमध्ये विधान परिषद यादीतून भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांचे नाव वगळण्यात आले आहे. हा प्रकार समोर येताच बँकेने ही आपली चुक झाली असेल तर सर्व डायऱ्या परत मागवल्या असून त्या पुन्हा छपाईसाठी पाठवण्यात आल्याचं सांगण्यात येत आहे.

जिल्हा बँकेच्या डायरीतून पडळकर गायब; राष्ट्रवादीला माझ्या नावाचं पित्त पडळकरांची टीका
...त्यामुळे इम्पिरिकल डेटा गोळा केला तरी OBC आरक्षण टीकू शकणार नाही - वडेट्टीवार

सांगली जिल्हा बँक (Sangli District Bank) प्रशासनाने यावर्षीच्या नवीन डायरीचे प्रकाशन केले. सर्व संचालकांस डायरीचे वाटप करण्यात आले. संचालकांनी पदाधिकारी व कार्यकर्त्यांना नवीन डायरी दिलेल्या आहेत. या डायरीमध्ये जिल्ह्यातील सर्व खासदार, आमदारांची नावे प्रसिध्द केली आहेत. परंतू विधान परिषद सदस्यांच्या यादीमध्ये आमदार मोहनशेठ कदम, आमदार अरुण लाड, आमदार सदाशिव खोत (Sadashiv Khot) ही नावे आहेत. भाजप आमदार (Gopichand Padalkar) गोपीचंद पडळकर यांचे नाव वगळण्यात आल्याचा प्रकार घडला आहे.

हे देखील पहा -

दरम्यान 'ही बँक राष्ट्रवादीच्या (NCP) ताब्यात आहे आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांना माझ्या नावाचे पित्त आहे. यामुळे ते यापेक्षा वेगळे काही करुच शकत नाहीत.' असं वक्तव्य गोपीचंद पडळकर यांनी केले आहे तर आपण अद्याप या नवीन डायरी बघितल्याच नसून जर अशी काय चूक झाली असेल तर ती सुधारण्यात येईल असं वक्तव्य बँकेचे चेअरमन मानसिंग नाईक (Mansingh Naik) केलं आहे.

Edited By - Jagdish Patil

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com