...त्यामुळे इम्पिरिकल डेटा गोळा केला तरी OBC आरक्षण टीकू शकणार नाही - वडेट्टीवार

'सरकार बरखास्त नाही केलं तर माझं नाव बदला, असे जाहीर आव्हान करीत मी कोर्टात जाईन, सुप्रीम कोर्टात जाईन'
vijay-vadettivar
vijay-vadettivarSaam TV
Published On

बुलढाणा : राज्यासाठी चिंताजनक बातमी समोर आली आहे.आणि ती म्हणजे ओमिक्रॉन (Omicron) हा व्हेरीयंट आता डेल्टा मध्ये परिवर्तित होत आहे आणि भरीस भर म्हणून स्प्रेडिंग रेट दुप्पट झालेला आहे त्यामुळे नक्कीच ही चिंताजनक बाब असून नागरिकांनी सुरक्षिततेचे उपाय अंमलात आणले नाही तर कोरोना हा घराघरात आल्याशिवाय राहणार नाही. तसेच लॉकडाऊन बाबत सध्या कुठलाही निर्णय झालेला नाही मात्र वेळ परिस्थिती पाहून निर्णय घेण्यात येणार असल्याचे संकेत राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार (Vijay Vadettiwar) यांनी दिले आहेत.

vijay-vadettivar
राज्यपालांचा शिवसेनेला दणका, पालिकेत मंजूर झालेला प्रस्तावाच्या चौकशीसाठी लोकायुक्तांना पत्र

नववर्षाच्या निमित्ताने ते श्री संत गजानन महाराजांच्या दर्शनासाठी शेगावात आले असता पत्रकारांशी बोलत होते ते म्हणाले, 'OBC इम्पिरिकल डेटा गोळा केल्यानंतरही ओबीसींचं राजकीय आरक्षण राहू शकणार नाही. जो पर्यंत 102 वी घटना दुरुस्ती होत नाही, आणि तो पर्यंत 50 टक्के आरक्षणाची मर्यादा वाढत नाही, तो पर्यंत ओबीसींना 27 टक्के राजकीय आरक्षण मुळीच मिळू शकता नसल्याचे विधान विजय वडेट्टीवार यांनी केलं आहे. त्यामुळे ओबीसींच्या राजकीय आरक्षणावर तर्कवितर्क लढवले जात आहेत.

vijay-vadettivar
मुस्लीम मुलींना विकण्याच्या जाहिराती पसरवणाऱ्यांवर कारवाई करा; गृहराज्यमंत्र्यांचे आदेश

सरकार बरखास्त नाही केलं तर माझं नाव बदला, असे जाहीर आव्हान करीत मी कोर्टात जाईन, सुप्रीम कोर्टात (Supreame Court) जाईन, असा इशाराही आमदार सुधीर मुनगंटीवार (Sudhir Mungantiwar) यांनी सरकारला नुकताच दिला होता. या विधानावर वडेट्टीवारांनी शेगाव येथे फिरकी घेतली. एका प्रश्नाच्या उत्तरात त्यांनी मुनगंटीवारानच नोमोल्लेख करीत त्यांनी आपला नाव ठरवून ठेवा कारण सरकार पडणार नाही असे ते म्हणाले. जेवढं डीवचाल तेवढं मजबूत सरकार होईल असही ते यावेळी म्हणाले.

Edited By - Jagdish Patil

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com