नाळवंडीत साथीच्या आजाराचे थैमान; डॅाक्टर मात्र सुट्टीवर

दांडीबहाद्दर डॉक्टरांमुळं कोट्यावधी रुपये खर्च करून बनवण्यात आलेल्या हॉस्पिटलमध्ये स्मशान शांतता पसरली आहे.
नाळवंडीत साथीच्या आजाराचे थैमान; डॅाक्टर मात्र सुट्टीवर
नाळवंडीत साथीच्या आजाराचे थैमान; डॅाक्टर मात्र सुट्टीवरSaam Tv
Published On

बीड: आतापर्यंत आपण इमारतीविना हॉस्पिटलची झालेली दुरवस्था पाहिली असेल. मात्र गडगंज पगारी घेऊन दांडी मारणाऱ्या बहाद्दर डॉक्टरांमुळं, गावात पसरलेलं साथीचं थैमान दाखवणार आहोत. कोट्यावधी रुपये खर्च करून बनवण्यात आलेल्या प्राथमिक रुग्णालयात स्मशान शांतता पसरली आहे. तर दुसरीकडं खाजगी रुग्णालयात चिकन गुनीयाच्या पेशंटला बेडसाठी प्रतीक्षा करावी लागत आहे. या गावाचा सविस्तर आढावा या बातमीच्या माध्यामातून घेऊयात.

बातमी आहे बीड तालुक्यातील नाळवंडी गावातील प्राथमिक आरोग्य केंद्राची. केंद्राची चकाचक इमारत बांधण्यासाठी जवळपास 1 कोटी 85 लाख रुपये खर्च झाले आहेत. ज्याचा उद्देश होता नाळवंडीसह परिसरातील वाड्या, वस्ती, तांड्यावरील ग्रामस्थांना हॉस्पिटलमध्ये चांगली सुविधा मिळावी. या हॉस्पिटलमध्ये ऑपरेशन थेटर, रक्ततपासणी लॅब, ऍडमिटची सुविधा, महिलांचे ऑपरेशन यासह अनेक सुविधा मिळाव्या म्हणून सुज्जत हॉल देखील आहेत. यासाठी आरोग्य विभागाने 2 डॉक्टरांची नेमणूक या हॉस्पिटलसाठी केलेली आहे. त्यापैकी एक निवासी आहे.

नाळवंडीत साथीच्या आजाराचे थैमान; डॅाक्टर मात्र सुट्टीवर
श्रीगुरू बालाजी तांबे कालवश

मात्र निवासी राहणं तर सोडा हे डॉक्टर साधं वेळेवर देखील हॉस्पिटलमध्ये येत नाहीत. सकाळी अकरानंतर आलेले डॉक्टर दुपारी 4 पूर्वी घरी जातात. यामुळे रात्री-अपरात्री येणाऱ्या रुग्णांना जीव गमावण्यासारख्या घटना देखील या नाळवंडी गावामध्ये घडलेल्या आहेत. या नाळवंडी प्राथमिक आरोग्य केंद्रातील दांडीबहाद्दर डॉक्टरांमुळं, हॉस्पिटल समोर असणाऱ्या बाळू वैद्य यांच्या पत्नीला गरोदर असताना वेळेवर उपचार न मिळाल्याने जीव गमवावा लागला आहे. तर गेल्या दीड महिन्यापूर्वी 20 वर्षीय तरुणाला साप चावल्यानंतर, रात्री उपचार न मिळाल्याने जीव गमवावा लागला आहे. एवढेच नाही तर दांडीबहाद्दरांमुळं गाव खेड्यातील या ग्रामस्थांना सुविधा मिळणं कठीण झालं आहे.

याविषयी बोलताना ग्रामस्थ युनूस शेख म्हणाले, की आता या गावपरिसरात गेल्या 15 ते 20 दिवसांपासून साथीच्या आजाराने थैमान घातलं आहे. घराघरात चिकनगुनिया आणि चिकनगुनिया सदृश्य रुग्ण आहेत. एका एका घरात 4-4 रुग्ण आहेत. विशेष म्हणजे यामध्ये लहान मुलांपासून वृद्धांपर्यंतचा समावेश आहे. मात्र एवढं सगळं गावांमध्ये सुरू असताना या दांडीबहाद्दर डॉक्टरांना याकडं लक्ष देनं महत्त्वाचा समजला नाही. आजही त्यांचे दांडी मारणे सुरूच आहे. यामुळं आम्हाला खाजगी रुग्णालयाचा आधार घ्यावा लागत आहे. मात्र आज आम्हाला उभा राहणं कठीण आहे. अशा परिस्थितीत बेड मिळणं कठीण झाल्यानं, सलाईन लावण्यासाठी तासंतास वाट पहावी लागत आहे. आज घरात 4 रुग्ण असून यासाठी गेल्या तीन दिवसात तब्बल 6 हजार रुपये खाजगी रुग्णालय गेले आहेत तर अद्यापही उपचार सुरूच आहे. जर आम्हा गावकऱ्यांना सरकारी हॉस्पिटलमध्ये सुविधा द्यायचा नसतील तर हे हॉस्पिटल सुरू कशासाठी केले. त्या हॉस्पिटलमध्ये कधीही गेलं तर डॉक्टर नसतात. तिथं उपचार दिला जात नाही. मग हॉस्पिटलला कुलूप लावून टाका. आणि जर हे झालं नाही सुविधा चांगल्या द्या अन्यथा आम्ही बेमुदत उपोषण करू. असा संतप्त प्रतिक्रिया वजा इशारा चिकन गुनीया सदृश्य आजार असणाऱ्या आणि चार दिवसांपासून उपचार घेत असणाऱ्या युनूस शेख यांनी दिलाय.

तर याविषयी ग्रामस्थ सिताराम राऊत म्हणाले, की काय फायदा सरकारी हॉस्पिटल पासून ? मी खूप परेशान आहे. आजही माझ्या घरात दोन माणसं पडलेले आहेत. मला देखील चार-पाच सलाईन झाल्या आहेत. सरकारी हॉस्पिटलमध्ये गेलं की तिथं कर्मचारी फक्त कोरोना टेस्ट करतात. आमच्या बाकीच्या आजाराकडे लक्ष देत नाही. आता मी सध्या माझ्या नातीला घेऊन हॉस्पिटलमध्ये आलो आहे. मात्र या खाजगी रुग्णालयात बेड उपलब्ध नाही. आज माझी पाचवी सलाईन आहे. पैसे घालवायचे तरी कुठपर्यंत. आम्ही मजुरी करून खातोत लखपती नाहीत. मग पैसे आणावेत कुठून ? एवढं मोठं हॉस्पिटल बांधल, मग लोकांना बघायचंचं नसेल तर कशाला बांधून ठेवलं. जर हॉस्पिटल नसलं चालवता येत तर बंद करून टाका. आम्ही आमचं मरू नाही तर मजुरी करून पैसे भरू.... अशी सणसणीत प्रतिक्रिया देखील त्यांनी यावेळी दिली

तर या विषयी खाजगी रुग्णालयाचे डॉक्टर वाघमारे म्हणाले, की सध्या वायरल फीवरचं सीजन आहे. त्यामुळे सध्या जॉईंटपेन, आणि चिकन गुनीया सदृश्य पेशंट येत आहेत. दररोज 40-50 पेशंट येतात. साधारण पंधरा दिवसांपासून ही साथ चालू असल्याचं लक्षात येत असून असे जवळपास 1 हजार ते 2 हजार पेशंट असतील. याला मुख्य कारण म्हणजे दूषित पाणी आहे. कारण ग्रामीण भागात पाणी साठवून ठेवलं जात. आणि त्यामुळे डासाची निर्मिती होत असून त्यातूनच हे साथीचे आजार पसरतात. असं देखील त्यांनी यावेळी सांगितले.

नाळवंडीत साथीच्या आजाराचे थैमान; डॅाक्टर मात्र सुट्टीवर
पडळकरांबाबत मी काय बोलू, ओबीसींसाठी अण्णा डांगे आक्रमक

दरम्यान कोरोना काळात ग्रामीण भागातील सर्वसामान्य नागरिक पुरता मेटाकुटीला आला आहे. शेतमाला भाव नाही तर गेल्या पंधरा दिवसांपासून पाऊस नसल्याने पीक जगवावी कशी? असा प्रश्न त्याच्यापुढे निर्माण झालाय. त्यात भर म्हणून आता या गावखेड्यात साथीच्या आजाराने थैमान घातलाय. आणि हे सुरू असताना एकीकडं कोट्यावधी रुपये खर्च करून हॉस्पिटलमध्ये डॉक्टर नसल्याने स्मशान शांतता पसरली आहे. तर दुसरीकडे साथीच्या आजाराने ग्रासलेल्या रुग्णांमुळं, खाजगी रुग्णालयात बेड मिळणं देखील कठीण झालं असून तपासणीसाठी वाट पाहावी लागत आहे. यामुळे कोट्यवधी रुपये खर्च करून चकाचक बनवण्यात आलेल्या, या प्राथमिक आरोग्य केंद्रातील दांडीबहाद्दर डॉक्टरांवर कारवाई करून, या चकाचक हॉस्पिटलमधील भेसूर वास्तव कधी दूर होणार ? असा संतप्त सवाल ग्रामस्थांकडून केला जात आहे.

Edited By: Pravin Dhamale

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com