पडळकरांबाबत मी काय बोलू, ओबीसींसाठी अण्णा डांगे आक्रमक

अण्णा डांगे
अण्णा डांगे
Published On

सांगली ः ओबीसी आरक्षणासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते, मंत्री छगन भुजबळ सुरूवातीपासून आक्रमक आहेत. आता माजी मंत्री अण्णा डांगे यांनीही रणशिंग फुंकले आहे. ओबीसींना 27 नाही तर 30 टक्के आरक्षण मिळालं पाहिजे. आमचे हक्काचे आरक्षण कमी करून देणार नाही. प्रसंगी सरकार विरोधात रस्त्यावर उतरू. असा इशारा देतानाच राष्ट्रवादीचे जेष्ठ नेते माजी, मंत्री अण्णासाहेब डांगे यांनी भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांच्या भूमिकेबद्दल कोपरखळी मारली. Anna Dange aggressive for OBC reservation

केंद्र सरकारने आणलेल्या विधेयकाबाबत पत्रकारांनी ज्येष्ठ नेते अण्णा डांगे यांचे मत जाणून घेतले. त्यावेळी ते बोलत होते.

अण्णा डांगे
भंडारदरा धरणाला क्रांतिवीर राघोजी भांगरेंचे नाव

आक्षरणाबाबतचे अधिकार केंद्र सरकारने राज्यांना देण्याचा घाट घातला आहे. हा चुकीचा पायंडा आहे. यातून देशात फुटीचे वातावरण तयार होईल. ओबीसीमध्ये किती जेवढ्या जाती आहेत. त्यांची गणना केली पाहिजे. त्यानंतरच आरक्षणाचा निर्णय घ्यावा. राज्य घटनेची निर्मिती करताना घटना समितीत ५० सदस्य होते. त्यांनी आरक्षणाचा अधिकार हा केंद्र सरकारकडे दिला आहे. कारण त्यांना माहिती होते की हा अधिकार राज्यांकडे दिला तर देशात आणि समाजात फूट पडू शकते. त्यामुळे केंद्र सरकारने राज्यांना अधिकार देण्याचा कायदा करू नये. 

स्वतःचा विचार करणारा स्वार्थी

भाजपचे आमदार पडळकर यांच्यामागे किती धनगर समाज आहे. याचा मला अंदाज नाही. परंतु जो समाजासाठी लढतो. त्यामागे नक्कीच समाज उभा राहतो. जो स्वतःचा विचार करतो तो स्वार्थी असतो. त्यांना वाटत असावे भविष्यात महाराष्ट्रात आपले सरकार येईल. मग आम्ही आरक्षण देऊ, असे सांगत अण्णांनी त्यांच्या भूमिकेला चिमटा काढला.Anna Dange aggressive for OBC reservation

राज्यात शेळ्या मेंढीचा व्यवसाय लोप पावत चालला आहे. त्यामुळे शेळी-मेंढी महामंडळाला 1 हजार कोटींचा निधी द्यावा. मेंढ्या कोणीही पाळू शकतो. शाहू महाराजांकडे मेंढ्या होत्या. त्यामुळे इतर समाजालाही मेंढ्या किंवा शेळ्या खरेदीसाठी सरकारने मदत केली पाहिजे, असे मतही अण्णांनी मांडले.

भाजप का सोडली, पुस्तक वाचा...

ज्येष्ठ नेते अण्णा डांगे हे युती सरकारमध्ये मंत्री होते. प्रारंभापासून ते भाजपसोबत होते. पश्चिम महाराष्ट्रासह इतर भागातही पक्ष रूजविण्यात त्यांनी कष्ट उपसले. नंतर मात्र त्यांना पक्षात मानाचे स्थान मिळाले नाही. पुढे त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. त्यावेळी भाजप का सोडली याबाबत विचारले असता, मी त्यावर पुस्तक लिहिलंय आहे, ते वाचा, असे सांगून त्यांनी अधिक भाष्य करण्याचे टाळले.

Edited By - Ashok Nimbalkar

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com