Onion Price News : कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी; CM शिंदेंनी अधिवेशनात दिली महत्वाची माहिती

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सभागृहात भाषण करताना, राज्यातील सरकार कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या पाठीशी असल्याचं म्हटलं आहे.
CM Eknath Shinde Onion Price News
CM Eknath Shinde Onion Price NewsSaam TV

Onion Price News : गेल्या काही दिवसांपासून राज्यात कांद्याचे भाव कमी झाले आहेत. त्यामुळे कांदा उत्पादक शेतकरी अडचणीत सापडला आहे. जीवापाड कष्ट करून पिकवलेला कांदा कवडीमोल भावात विकला जात असल्याने बळीराजाला अश्रू अनावर झाले. दरम्यान, हाच मुद्दा विरोधकांनी आज विधिमंडळाच्या अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी लावून धरला. या मुद्द्यावर विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार, छगन भुजबळ, माजी गृहमंत्री अनिल देशमुख, यांच्यासह विरोधकांनी विधान भवनाच्या पायऱ्यांवर आंदोलन केले. (Latest Marathi News)

CM Eknath Shinde Onion Price News
Sanjay Raut : आमची ही लढाई चोर, डाकू अन् त्यांच्या…; संजय राऊतांचा हल्लाबोल

या आंदोलनानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहात भाषण करताना, राज्यातील सरकार कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या पाठीशी असल्याचं म्हटलं आहे. सभागृहातील भावना आणि शेतकऱ्यांच्या कांद्याची परिस्थिती आपल्या लक्षात आली आहे. शेवटी हे सरकार शेतकऱ्यांचं सरकार आहे. शेतकऱ्यांना न्याय देणारं सरकार आहे. म्हणून आम्ही निकर्ष आणि नियम डावलून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई दिलेली आहे, असं एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे.  (Maharashtra Political News)

कांदा उत्पादक शेतकऱ्यांसोबत सरकारपूर्णपणे पाठीशी उभं आहे. आता नाफेडनं कांदा खरेदी सुरू केली आहे. ज्या ठिकाणी खरेदी सुरू झाली नसेल ती सुरू केली जाईल, असं आश्वासनही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी सभागृहात बोलताना दिलं आहे. दरम्यान, शिंदेंनी यांनी ही माहिती देताच, विरोधकांनी त्यांना चांगलंच धारेवर धरलं. मुठभर व्यापाऱ्यांसाठी सरकार चालतं का? डबल इंजिनचे सरकार शेतकऱ्यांसाठी काय करणार? असा सवाल विरोधकांनी सभागृहात उपस्थित केला.

CM Eknath Shinde Onion Price News
Eknath Shinde News: अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी CM शिंदेंची मोठी खेळी; उद्धव ठाकरेंना मोठा धक्का बसणार?

दुसरीकडे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी सुद्धा सभागृहात विरोधकांच्या आरोपांना जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. आपल्याला शेतकऱ्यांच्या प्रश्नावर मार्ग काढायचा आहे की राजकारण करायचं आहे? असा सवाल फडणवीसांनी भर सभागृहात विरोधकांना विचारला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितल्याप्रमाणे कांद्याची खरेदी (Onion Price) नाफेडने सुरू केली आहे. विरोधकांकडे जर वेगळी माहिती असेल, तर त्यांनी हक्कभंग आणावा, असं आव्हान देखील फडणवीसांनी भर सभागृहात विरोधकांना दिलं.

कांदा प्रश्नावरून विरोधक आक्रमक

अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी विरोधी पक्षनेते अजित पवार, छगन भुजबळ, पृथ्वीराज देशमुख, अनिल देशमुख यांच्यासह विरोधी पक्षाच्या सर्व आमदारांनी विधानभवनाच्या पायऱ्यांवर उभे राहून सरकार विरोधात घोषणा दिल्या. 'कांदा कापूसचे हाल काय, शिंदे फडणवीस हाय हाय', 'कांद्याला भाव मिळालाच पाहिजे', 'कांदा खरेदी केंद्रे सुरु झालीच पाहिजेत', अशा घोषणांनी विरोधकांनी विधिमंडळाचा परिसर दणाणून सोडला.

Edited By - Satish Daud

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com