Wardha Accident News: ओव्हरटेकच्या नादात भरधाव ट्रॅव्हल्सची टँकरला धडक, एकाचा मृत्यू; ५ गंभीर जखमी

Travels And Tanker Accident: नागपूर-हैद्राबाद राष्ट्रीय महामार्गावरील (Nagpur-Hydrabad National Highway) बरबडी शिवारात हा अपघात झाला.
Travels And Tanker Accident
Travels And Tanker AccidentSaam Tv
Published On: 

चेतन व्यास, वर्धा

Wardha News: वर्धामध्ये ट्रॅव्हल्स आणि टँकरचा भीषण अपघात (Travels and Tanker Accident) झाल्याची घटना समोर आली आहे. या भीषण अपघातामध्ये एकाचा मृत्यू झाला तर ५ जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना तात्काळ उपचारासाठी नागपूर येथील एम्स रुग्णालयामध्ये हलवण्यात आले आहे. नागपूर-हैद्राबाद राष्ट्रीय महामार्गावरील (Nagpur-Hydrabad National Highway) बरबडी शिवारात हा अपघात झाला. या अपघाताचा तपास वर्धा पोलिसांकडून (Wardha Police) सुरु आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, ओव्हरटेक करण्याच्या नादात भरधाव ट्रॅव्हल्सने पेट्रोलच्या टँकरला जोराद धडक दिली. नागपूर-हैद्राबाद राष्ट्रीय महामार्गावरील बरबडी येथे हा अपघात झाल. या भीषण अपघातात एका प्रवाशाचा मृत्यू झाला. तर ५ प्रवासी गंभीर जखमी झाले. या अपघातामध्ये धीरज कुलकर्णी (वय ४८ रा. बल्लारशा जि. चंद्रपूर) या प्रवाशाचा मृत्यू झाला आहे. अपघातात ५ जण गंभीर जखमी असून त्यांना उपचारासाठी नागपूरच्या एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

महाराजा ट्रॅव्हल्सची बस राजुराकडून नागपूर येथे प्रवाशांना घेऊन जात होती. याचदरम्यान समोर असलेल्या टँकरच्या समोर अचानक गाय आडवी आल्याने चालकाने ब्रेक मारला. त्यामुळे या टँकरला ओव्हरटेक करत असलेल्या ट्रॅव्हल्सने टँकरला पाठी मागून धडक दिली. या अपघातात धीरज कुलकर्णी या प्रवाशाचा रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला.

अपघातात ५ जण गंभीर जखमी असून यामधील तिघांची प्रकृती चिंताजनक आहे. या सर्वांना नागपूरच्या बुट्टीबोरी येथील एम्स रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहेत. तर किरकोळ जखमी असलेल्यांना प्रथमोपचार करुन घरी सोडण्यात आले आहे. हा अपघात इतका भीषण होता की अपघातामध्ये ट्रव्हल्सच्या समोरील भागाचा चक्काचूर झाला आहे. या अपघाताचा तपास वर्धा पोलिसांकडून सुरु आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com