Karad Crime News : कराड तालुक्यातील प्रसिद्ध मारुती मंदिरात दीड लाखांची चाेरी; पाेलीस तपास सुरु

या घटनेचा तपास करण्यासाठी पाेलीसांची पथकं तयार करण्यात आली आहेत.
Karad , potle maruti mandir, crime news
Karad , potle maruti mandir, crime newssaam tv

Karad Crime News : कराड (karad) तालुक्यातील पोतले येथील मारुती मंदिरातील दानपेटी चोरट्यांनी फोडुन अंदाजे दीड लाखाची रोकड लंपास केल्याची घटना घडली आहे. या चाेरीची माहिती समजताच कराड तालुका पोलिस मंदिरात पाेहचले. चोरट्यांचा तपासासाठी पथक तयार केल्याची माहिती (satara) वरिष्ठ पाेलिस अधिका-यांनी दिली. (Karad Latest Marathi News)

पोतले येथे श्री स्वयंभू मारुती मंदिर आहे. या मंदिरात नेहमीच भाविकांची गर्दी असते. भाविक श्रद्धापुर्वक या मंदिरात आपआपल्या परीने दानधर्म करीत असतात. या मंदिरातील दानपेटी फोडल्याचा प्रकार नुकताच उघडकीस आला आहे. (Maharashtra News)

Karad , potle maruti mandir, crime news
Bribe : रजा मंजूरीसाठी पैशांची मागणी, गट शिक्षण अधिका-यासह दाेघे एसीबीच्या जाळ्यात

या घटनेमुळे गावात खळबळ उडाली आहे. ही चाेरी पहाटेच्या सुमारास घडल्याचा अंदाज ग्रामस्थांनी व्यक्त केला आहे. या मंदिरातील दानपेटी पोतले ग्रामपंचायत कार्यालया शेजारील रस्त्याच्या कडेला असलेल्या शेताच्या बांधावर पडली हाेती.

Karad , potle maruti mandir, crime news
Crime News : Nagpur News: मित्राच्या पत्नीचे अपहरण केले, जंगलात नेऊन केले अत्याचार; त्यानंतर घडलं ते भयंकर

या घटनेत सुमारे दीड लाख रुपयांची चाेरी झाल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. या घटनेची माहिती समजताच घटनास्थळी कराड तालुका पोलीस ठाण्याचे पोलिस निरीक्षक आनंदराव खोबरे, कोळे दूरक्षेत्राचे अमोल देशमुख, वेदपाठक, डीबीचे उत्तम कोळी, पोतले गावच्या पोलिस पाटील फरजाना मुल्ला हे पाेहचले. या घटनेचा तपास करण्यासाठी पाेलीसांची पथकं तयार करण्यात आली आहेत. (Tajya Batmya)

Edited By : Siddharth Latkar

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com