धक्कादायक! मधमाशाच्या हल्ल्यात उपसरपंचाचा मृत्यू

भोला महादेव नगराळे असं मृत्यू झालेल्या व्यक्तीचं नावं आहे.
One died from a honey bee sting in yavatmal
One died from a honey bee sting in yavatmalSaam Tv
Published On: 

संजय राठोड

यवतमाळ: यवतमाळ जिल्ह्यातील येडशी गावामध्ये मधमाशाच्या (Honey Bee) हल्ल्यात एकाचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. भोला महादेव नगराळे असं मृत्यू झालेल्या व्यक्तीचं नावं आहे. ते येडशी या गावचे उपसरपंच होते. येडशी येथील अपना देश बार समोरील झाडाजवळ घडली.

भोला महादेव नगराळे हे येडशी येथील अपना देशी बार समोरील झाडा जवळून जात होते, यावेळी त्यांच्यावर अचानक मधमाशांनी (Honey Bee) हल्ला चढविला. यात ते गंभीर जखमी झाले होते. काही नागरिकांनी त्यांना रुग्णालयात दाखल केले. पण डॉक्टरांनी मृत्यू झाल्याचे घोषित केले. मधमाशा चावल्याने मृत्यू झाल्याचे समजताच परिसरात हळहल व्यक्त करण्याती आहे. (Honey Bee)

कालच येडशी या गावातील सोसायटीचा निकाल जाहीर झाला. यात मृत्यू झालेल्या भोला महादेव नगराळे यांच्या आई विजयी झाल्या आहेत. आईचा विजयोत्सव साजरा करुन काही तास उलटत नाहीत तोपर्यंत भोला यांचा मधमाशांच्या हल्ल्यात मृत्यू झाला.

Edited By- Santosh kanmuse

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.