

संजय राठोड
पाचखेड येथील उत्खननातून पश्चिम व पूर्व विदर्भातील लोहयुगीन समाजाची संलग्नता पाहणे, भोकरदन ते पवनी जोडणाऱ्या सातवाहन काळातील व्यापारी स्थळाचे महत्व तपासणे हा उद्देश उत्खननाच्या माध्यमातून पूर्ण केला जाणार आहेत.
यवतमाळच्या बाभुळगाव तालुक्यातील पाचखेडा येथे पुरातत्व विभागाच्या वतीने उत्खनन सुरू आहे. पाचखेडा येथील उत्खननात सातवाहन काळाच्या खुणा सापडल्या आहेत. पाचखेडा हे गाव दोन नद्यांच्या संगमापासून एक किलोमीटर अंतरावर आहे.
दक्षिण पूर्वेस चंद्रभागा नदीच्या डाव्या तीरावर हे गाव वसलेले आहे. पुलगाव बाभुळगांव रस्त्यावर सिंधी गावाच्या पूर्वेस तीन किमी आणि यवतमाळ शहरापासून 43 किमी अंतरावर सदर गाव आहेत. या वस्तीच्या पुरास्थळीला स्थानिक पातळीवर सासु सुनेचे उखाडे आणि बरड म्हणून ओळखले जाते पुरातत्त्व विभागाने या ठिकाणी उत्खनन सुरू केले आहेत.
सातवाहन काळातील व्यापारी मार्गावर असलेल्या या स्थळाचे पुरातत्वीय महत्त्व लक्षात घेऊन उत्खनन सुरू आहेत. येथे सातवाहन कालीन विहिर देखील आढळून आल्यात. तसेच अनेक खापरी, मडकी भांडी आढळली आहेत. उत्खननात पुढे आणखी कोणत्या पुरातन गोष्टीचा उलगाडा होतो याकडे सर्वांचे लक्ष लागले आहेत.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.