Maharashtra Politics: 'देवेंद्र फडणवीस ओबीसीमुळे निवडून येतात, तरी...'; ओबीसी नेत्याचा गंभीर आरोप

Maharashtra Politics: ओबीसी नेते प्रकाश शेंडगे यांनी भाजप नेत्यांवर टीकास्त्र सोडलं आहे.
Maharashtra Politics:
Maharashtra Politics:Saam tv
Published On

Maharashtra Political News:

गेल्या दोन महिन्यांपासून राज्यातील राजकारण आरक्षणाच्या मुद्द्यावरुन तापलं आहे. मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण देण्याची मागणी केली आहे. मनोज जरांगे यांच्या या मागणीला ओबीसी नेत्यांकडून विरोध दर्शवला जात आहे. याच मुद्यावरून ओबीसी नेते प्रकाश शेंडगे यांनी भाजप नेत्यांवर टीकास्त्र सोडलं आहे. (Latest Marathi News)

ओबीसी नेते प्रकाश शेंडगे यांनी हिंगोलीत राज्यस्तरीय ओबीसी मेळाव्याला हजेरी लावली. या मेळाव्याआधी प्रकाश शेंडगे यांनी हिंगोलीत प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरून भाजप नेत्यांवर टीका केली. प्रकाश शेंडगे म्हणाले, 'देवेंद्र फडणवीस यांच्या मतदारसंघातून ओबीसी मतांमुळे प्रचंड मताने निवडून येतात. पण तरी देखील ओबीसी समाजाच्या मागण्यांबाबत भाजपकडून चालढकल सुरू आहे. राज्यात जनगणनेला भाजपचाच विरोध आहे का? जनगणनेचा खर्च केंद्राने नाही तर राज्याने करावा'. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Maharashtra Politics:
Mumbai News: 'रावण दहन आदल्यादिवशीच घ्या..' सरकारच्या आदेशावर कॉंग्रेसचा संताप; CM शिंदेंना धाडले पत्र

पंकजा मुंडे यांच्यावर भाष्य करताना प्रकाश शेंडगे म्हणाले, 'भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे यांना पुन्हा एकदा पक्षाकडून डावलण्यात आलं आहे. चार राज्यांच्या निवडणुकीसाठी भाजपकडून स्टार प्रचारकांची यादी जाहीर करण्यात आली. यामधून पंकजा मुंडे यांचे नाव वगळण्यात आले आहे.

'भारतीय जनता पक्ष हा स्वत:च्या वडिलांची प्रॉपर्टी आहे, असा समज पंकजा मुंडे यांना झाला होता. पण भाजपमध्ये जे मुंडे यांच्या बाबतीत घडत आहे. त्यातून आता मुंडे कुटुंबीयांना आणखी काय मिळेल, अशी अपेक्षा न करता त्यांनी स्वतंत्र अस्तित्व तयार करावं, असा सल्ला प्रकाश शेंडगे यांनी पंकजा मुंडे यांना दिला.

Maharashtra Politics:
Nitin Gadkari News: मुंबई-गोवा महामार्ग का झाला नाही? ; नितीन गडकरींनी नेमकं कारण सांगितलं, जबाबदारीही घेतली

'आरक्षणाच्या मागण्यांमुळे महाराष्ट्रातील वातावरण ढवळून निघालं आहे. राज्याने आतापर्यंत सामाजिक समतोलाच वातावरण निर्माण केलं आहे. प्रत्येकाला आरक्षण मागण्याचा हक्क आहे. पण दुसऱ्याच्या ताटातले खेचून घेण्याचा अधिकार कुणाला नाही, अशी प्रतिक्रिया प्रकाश शेंडगे यांनी आरक्षणावरून सुरू असलेल्या वादावर दिली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com