
भरत मोहोळकर, साम टीव्ही
मुंबई : हा व्हिडीओ आहे २०२१ मध्ये तत्कालीन केंद्रीय मंत्री नारायण राणेंच्या अटकेचा. हा व्हिडीओ सध्या पुन्हा एकदा चर्चेत आलाय. त्याला कारण ठरलंय नितेश राणेंनी उद्धव ठाकरेंना दिलेला इशारा. बापाचा अपमान केला म्हणून मुलाने बदल्याची प्रतिज्ञा करणं हे सिनेमात पाहिलं असेल. मात्र आता सिनेमातील बदल्याची भावना थेट राजकारणात शिरलीय. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना नारायण राणेंना जेवत्या ताटावरुन उठवून अटक केल्याच्या घटनेची आठवण काढत मत्स्य व बंदरे मंत्री नितेश राणेंनी थेट ठाकरेंना इशारा दिलाय. जोपर्यंत परतफेड करणार नाही तोपर्यंत तो व्हिडीओ डिलीट करणार नाही, असा इशाराच राणेंनी दिलाय. तर नितेश राणेंनाच तुरुंगात जावं लागेल, असा पलटवार अंबादास दानवेंनी केलाय.
2021 मध्ये तत्कालिन केंद्रीय मंत्री नारायण राणेंना का अटक करण्यात आली होती?
23 ऑगस्ट 2021
स्वातंत्रदिनाच्या संदर्भाने नारायण राणेंचं मुख्यमंत्र्यांबद्दल वादग्रस्त वक्तव्य
24 ऑगस्ट 2021
जनआशीर्वाद यात्रेदरम्यान राणेंचं संगमेश्वरमध्ये जेवण
पोलिसांनी रत्नागिरीतील संगमेश्वरमधून राणेंना जेवत्या ताटावरुन अटक
त्याच रात्री महाडच्या न्यायालयाकडून जामीन मंजूर
एवढंच नाही तर राणेंच्या अटकेमागे अनिल परबांचाही हात असल्याचं स्पष्ट झालं होतं
नारायण राणेंच्या अटकेचा बदला घेण्याचा इशारा नितेश राणेंनी दिलाय. तर या अटकेमागे परबांचाही हात असल्याने नितेश राणे हे परब आणि उद्धव ठाकरेंच्या अटक करुन बदला घेणार का? याकडे लक्ष लागलंय. मात्र महाराष्ट्राच्या राजकारणात रुजत असलेली बदल्याच्या राजकारणाची भाषा ही राजकीय संस्कृतिला सुरुंग लावल्याशिवाय राहणार नाही.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.