- विनायक वंजारे
Nitesh Rane News : जालना येथील मराठा समाजावर झालेल्या (antarwali sarathi) लाठीचार्जचे समर्थन कोणी करणार नाही. हा लाठीचार्ज कोणी मस्ती करून केले असेल तर त्या अधिकाऱ्यांना आमचे सरकार सोडणार नाही. त्यांच्यावर कारवाई होणार असा विश्वास आमदार नितेश राणे यांनी व्यक्त केला. (Maharashtra News)
राणे म्हणाले शांत पध्दतीने आंदोलन सुरू असताना दगड नेमके कोणी मारले ? या पूर्वीच्या 58 मोर्चात कोणालाही त्रास झाला नाही. शांत मोर्चा काढणारा मराठा समाज पोलिसांवर दगडफेक करेल असे मला वाटत नाही असा विश्वासही राणेंनी व्यक्त केला.
मराठा समाजाला नेमकं कोण बदनाम काेणाला करायचे आहे असा सवाल राणेंनी केला. ते म्हणाले मराठा समाजाला राणे साहेबांच्या समितीने आरक्षण मिळवून दिले आणि फडणवीस साहेबांनी ते ताकतीने सांभाळलं. विरोधकांनी केवळ मराठा समाजाची केस नाजूक कशी होईल यासाठी प्रयत्न केले असेही राणेंनी म्हटले.
ज्या सामना मुखपत्रात मराठा समाजाच्या माता भगिनींचा अपमान केला तेच आमच्यावर टीका करत आहेत असेही राणेंनी नमूद केले. वडेट्टीवार यांनी मराठा समाजावर बोलू नये असे राणेंनी म्हटले.
...तर आम्ही सहन करणार नाही : राणे
दरम्यान मराठा समाजाच्या मुलांवर केसेस झाल्या तर हे नेते येणार का. आमच्या मुलांवर चुकीच्या केसेस टाकू नका अशी मी विनंती करणार आहे. स्वतः जातीने लक्ष घालणार आहे. फडणवीस यांनी मराठा समाजाला आरक्षण दिलंय. त्यामुळे त्यांना बदनाम कोण करत असेल तर आम्ही सहन करणार नाही असेही नितेश राणेंनी म्हटलं.
Edited By : Siddharth Latkar
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.