Nipah Virus Kerala: निपाह व्हायरसने वाढवली चिंता... आरोग्य यंत्रणा अलर्ट; ऑस्ट्रेलियातून मागवले अँटीबॉडीचे डोस

Nipah Virus Kerala Latest News: केरळमध्ये निपाह व्हायरसचा धोका दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे.
Nipah Virus Kerala
Nipah Virus KeralaSaam Tv

Nipah Virus Kerala :

कोरोनाच्या महामारीतून सावरुन पुन्हा देश प्रगतीकडे झेपावत असतानाच आणखी एका महारोगाने डोकेदुखी वाढवली आहे. केरळमध्ये निपाह व्हायरसचा धोका दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. केरळमध्ये आत्तापर्यंत निपाहचे सहा रुग्ण समोर आले आहेत. विषाणूंचा प्रसार रोखण्यासाठी हालचाली सुरू झाल्या असून ऑस्ट्रेलियाकडून मोनोक्लोनल अँटीबॉडीजचे डोस मागवण्यात आले आहेत.

Nipah Virus Kerala
Dahanu News: तुझ्या नवऱ्याला सरकारी नोकरी लावतो, भूलथापा देऊन भोंदूबाबाचा महिला पोलिसावर अत्याचार

याबाबत सविस्तर माहिती अशी की, केरळमध्ये निपाह व्हायरसचा धोका दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. केरळच्या कोझिकोड जिल्ह्यात आणखी एका ३९ वर्षीय पुरुषाला निपाह व्हायरसची लागण झाल्याचे निदान झाले आहे. केरळमधील हा सहावा रुग्ण आहे. तर आत्तापर्यंत दोघांचा यामध्ये मृत्यू झाला आहे.

निपाहचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेत केंद्र सरकारकडून उपायात्मक हालचाली सुरू झाल्या आहेत. उपचारासाठी ऑस्ट्रेलियाकडून मोनोक्लोनल अँटीबॉडीजचे आणखी 20 डोस खरेदी करणारआहे. तसेच केरळमध्ये संक्रमित रुग्णांची संख्या वाढल्यामुळे, कर्नाटक सरकारनेही आपली दक्षता वाढवली आहे. कर्नाटक सरकारने लोकांना प्रभावित जिल्ह्यांमध्ये प्रवास टाळण्यास सांगितले आहे. याशिवाय सीमावर्ती जिल्ह्यांमध्ये तापावर लक्ष ठेवण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत.

याबाबत बोलताना डीजी बहल यांनी असेही सांगितले की निपाहमध्ये संक्रमित लोकांचा मृत्यू दर खूप जास्त आहे तर कोविडमध्ये मृत्यू दर 2-3 टक्के होता. केरळमध्ये विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी सर्व प्रयत्न सुरू आहेत. सर्व रुग्णांना 'इंडेक्स पेशंट' (पुष्टी झालेल्या संसर्गाचा पहिला रुग्ण) संपर्कातून संसर्ग झाला आहे. (Latest Marathi News)

Nipah Virus Kerala
Nandurbar News: आरोग्य यंत्रणा सलाईनवर; नंदुरबार जिल्हा रुग्णालयात तीन महिन्यांत १७९ बालमृत्यू

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com