आता 'या' विभागांनी देखील राहूल कनालच्या घरावर छापे मारले पाहिजेत : निलेश राणे

कनाल यांच्यावरील कारवाईनंतर राणे बंधू आक्रमक झाले आहेत.
rahul kanal and aaditya thackeray
rahul kanal and aaditya thackeraysaam tv
Published On

कणकवली : आदित्य ठाकरेचा पुरवठामंत्री राहुल कनाल (Rahul Kanal) अगोदर बाबा सिद्दिकीच्या चपला उचलायचा. अचानक शिवसेनेत (shivsena) गेला आणि पेंग्विनच्या जवळ गेला. कोरोना (corona) काळात अनुभव नसताना वेगवेगळ्या कॉन्ट्रॅक्टच्या माध्यमातून पैसे कमावले पण कनाल विसरला नियती मेलेल्या माणसाच्या नावावर पैसे कमवणा-याला सोडत नाही अशी जहरी टीका भाजपचे माजी खासदार निलेश राणे यांनी कनाल यांच्याबाबत केली आहे.

युवासेनेचे पदाधिकारी राहुल कनाल यांच्या घरी आज (मंळगवार) सकाळी आयकर विभागाने (income tax department) छापा टाकला. कनाल हे राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांचे निकटवर्तीय समजले जातात. कनाल यांच्यावरील कारवाईनंतर राणे बंधू (nitesh rane) (nilesh rane) आक्रमक झाले आहेत. (rahul kanal latest marathi updates)

माजी खासदार निलेश राणे (nilesh rane) यांनी ट्विट करुन राहुल कनाल हा व्यक्ती बांद्रा या भागात कोणालाही विचारलं तरी कळेल याचे खरे धंदे काय. नाईटलाइफ गॅंग मधला हा प्रमुख, स्वतः हुक्का पार्लर चालवतो आणि त्या माध्यमातून घाणेरडे धंदे करतो असा आराेप कनाल यांच्यावर केला आहे.

rahul kanal and aaditya thackeray
शिवसेनेला आणखी एक धक्का; आदित्य ठाकरेंचे निकटवर्तीय राहुल कनाल यांच्या घरावर IT ची धाड!

आयकर विभागासह नारकोटिक्स डिपार्टमेंट आणि वुमन राईट कमिशन विभागाने पण या राहुल कनालच्या घरावर आणि ऑफिसवर छापे मारले पाहिजे अशी अपेक्षा देखील राणेंनी ट्विट करुन व्यक्त केली आहे.

Edited By : Siddharth Latkar

rahul kanal and aaditya thackeray
Nari Shakti Purskar: महाराष्ट्रातल्या तीन महिलांना केंद्राचा ‘नारी शक्ती पुरस्कार' जाहीर
rahul kanal and aaditya thackeray
World Cup: टीम इंडिया 'अजिंक्य'; फिरकीपटू राजेश्वरी गायकवाड पुढं पाक गारद

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com