New Year 2022: श्रॉफ हायस्कूलमध्ये सामुहिक सूर्यनमस्कार करत नववर्षाचं जल्लोषात स्वागत...

यावेळी उपस्थित क्रिडा अधिकारी सुनंदा पाटील यांनी या सूर्यनमस्कार उपक्रमाचे कौतुक केले.
New Year 2022: श्रॉफ हायस्कूलमध्ये सामुहिक सूर्यनमस्कार करत नववर्षाचं जल्लोषात स्वागत...
New Year 2022: श्रॉफ हायस्कूलमध्ये सामुहिक सूर्यनमस्कार करत नववर्षाचं जल्लोषात स्वागत...दिनू गावित
Published On: 

नंदुरबार: नंदूरबार शहरातील श्रॉफ हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयात नववर्षाचे स्वागत करीत ३५० विद्यार्थ्यांनी सामुहिक सूर्यनमस्कार काढून नववर्षाचं स्वागत उत्साहाच केलंय. आयुष्य आरोग्यदायी व्हावं या अनुशंगाने आज या शाळेच्या प्राणंगणात माध्यमिक विभागाच्या जवळपास साडेतीनशे विद्यार्थ्यांनी अतिशय मनमोहक पद्धतीने सुर्यनमस्कार (Sun salutation) करुन नववर्षाची (New Year 2022) सुरवात केली आहे. कोरोनाच्या पार्श्वभुमीवर अतिशय निवडक विद्यार्थीं आणि शिक्षकांच्या उपस्थितीमध्ये संपन्न झालेल्या या सामुहिक सुर्यनमस्कार कार्यक्रमाच्या वेळी विद्यार्थ्यांमध्ये उत्साह पहवायास मिळाला. (New Year 2022: Collective sun salutation at Shroff High School to welcome the new year)

हे देखील पहा -

जवळपास १४ वर्षांपासुन श्रॉफ शाळा हा उपक्रम राबवत आहे. यावेळी उपस्थित क्रिडा अधिकारी सुनंदा पाटील यांनी या सुर्यनमस्कार उपक्रमाचे कौतुक केले, तर स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक रविंद्र कळमकर यांनी असा उपक्रम सर्वच शाळांना अनिवार्य करण्याची गरज देखील व्यक्त केली.

Edited By - Akshay Baisane

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.