मोठी बातमी! NEET पेपरफुटीचं लातूर कनेक्शन उघड; सेवानिवृत्त प्राध्यापकाच्या घराची झडती; मोबाईल आणि कागदपत्रे ताब्यात

NEET Paper Leak Case Latur Connection: NEET पेपरफुटी प्रकरणात लातूर कनेक्शन समोर आले आहे. सीबीआयने सेवानिवृत्त प्राध्यापकाच्या घराची झडती घेतली असून सीबीआयने काही कागदपत्रे आणि मोबाईल फोन ताब्यात घेतला आहे.
NEET Paper Leak Case Latur Connection
NEET PAPER LEAK CASE: LATUR CONNECTION SURFACES, CBI SEARCHES RETIRED PROFESSOR’S HOUSEsaam tv
Published On
Summary
  • NEET पेपरफुटी प्रकरणात लातूर कनेक्शन समोर आले.

  • सीबीआयने सेवानिवृत्त प्राध्यापकाच्या घरावर झडती टाकली.

  • मोबाईल आणि महत्त्वाची कागदपत्रे जप्त करण्यात आली.

सीबीआयकडून वैद्यकीय प्रवेशासाठी घेण्यात येणाऱ्या नीट पेपरफुटीचा सखोल तपास सुरू आहे. या पेपर फुटीचं लातूर कनेक्शन आता उघड झाले आहे. नाशिक, अहिल्यानगर, पुणेनंतर NEET पेपरफुटी प्रकरणाच्या तपासात लातूर कनेक्शन समोर येत आहे. सीबीआयच्या तपासातून नवनवीन धागेदोरे समोर येत आहेत.

NEET Paper Leak Case Latur Connection
NEET Paper Leak Case: नीट पेपर फुटीप्रकरणात मोठी कारवाई, महाराष्ट्रातून आणखी दोघांना बेड्या

तपासादरम्यान लातूरमधील एका सेवानिवृत्त प्राध्यापकाच्या घरी आज पोलिसांनी झडती घेतली. यावेळी काही कागदपत्रे आणि मोबाइलही जप्त करण्यात आला आहे. पुण्यात ब्युटी पार्लर चालवणाऱ्या मनीषा वाघमारे हिच्याशी संबंधित सेवानिवृत्त प्राध्यपकाचा संपर्क असल्याचे उघड झाले आहे. दोघांमधील संपर्काचा उलगडा कॉल डिटेल्समधून झाल्याची सांगितले जातंय.

NEET Paper Leak Case Latur Connection
NEET 2026: मोठी बातमी! अखेर 'नीट' परीक्षा रद्द; पेपरफुटीची CBI चौकशी होणार, केंद्र सरकारचा मोठा निर्णय

पुणे पोलिसांनी बुधवारी ब्युटीपार्लर चालक मनीषा वाघमारे महिलेला बिबडेवाडी येथून अटक करण्यात आली होती. त्यानंतर मनीषाला सीबीआयकडे सोपविण्यात आले. आता सीबीआयच्या चौकशीत मनिषाचे लातूर कनेक्शन समोर आले आहे. त्यानंतर लातूरमधील एका सेवानिवृत्त प्राध्यापकाच्या घरी पोलीस अधिकाऱ्यांनी झडती घेतली. त्यासाठी सीबीआय पथक मध्यरात्रीच लातूरमध्ये आले.

पेपर सेटिंगमध्ये सहभाग होता का?

संबंधित सेवानिवृत्त प्राध्यापक नीट पेपर सेट करण्याच्या प्रक्रियेत सहभाग होता का? याबाबत मोबाईल तपासात काही आर्थिक व्यवहार झाले आहेत का? याचीही चौकशी सुरू आहे. दरम्यान सीबीआयचे पथक आता लातूरमधील विविध महाविद्यालये तसेच खासगी ट्युशन एरियातील कोणत्या व्यक्तींशी या प्राध्यापकाचे संबंध होते का, याची तपासणी करत आहे. याआधी काही खासगी क्लास चालकांचीही चौकशी करण्यात आली होती.

दरम्यान सीबीआयच्या पथकाने संबंधित सेवानिवृत्त प्राध्यापकाच्या घराची झडती घेतली. यात त्यांनी काही कागदपत्रे आणि मोबाईल ताब्यात घेतल्याची माहिती समोर आली आहे. या कारवाईमुळे लातूरच्या शिक्षण क्षेत्रात मोठी खळबळ उडाली आहे. मध्यरात्रीच्या नंतर सेवानिवृत्त प्राध्यापकाच्या घरी हे पथक पोहोचले. घराची झाडाझडती घेतल्यानंतर सेवानिवृत्त प्राध्यापकाला ताब्यात घेण्यात आलंं.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com