आदित्य ठाकरे अडचणीत? आरे आंदोलनात मुलांचा वापर केल्याचा NCPCR चा ठपका

शिवसेनेचे आमदार आणि युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे अडचणीत सापडले आहेत.
Aditya Thackeray latest news update
Aditya Thackeray latest news updateSaam Tv
Published On

मुंबई : राजकीय वर्तुळातून मोठी बातमी समोर आली आहे. शिवसेनेचे आमदार आणि युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) अडचणीत सापडले आहेत. मेट्रो कारशेड (Metro Carshed) आरेच्या जंगलात होत आहे. या प्रकल्पात वृक्षतोड (Deforestation) होऊ नये यासाठी सेव्ह आरेच्या माध्यमातून रविवारी आंदोलन करण्यात आले. आदित्य ठाकरे यांनी राज्य सरकारविरोधात केलेल्या आंदोलनात सहभाग घेतला होता. त्यावेळी आंदोलनात लहान मुलंही असल्याची माहिती समोर आली होती.'सेव्ह आरे'आंदोलनामध्ये (Save Aarey Strike) आदित्य ठाकरे यांनी मुलांचा बालकामगार म्हणून वापर केला, असा आरोप ठाकरे यांच्यावर करण्यात आला. याच पार्श्वभूमीवर राष्ट्रीय बाल संरक्षण आयोग (NCPCR) आदित्य ठाकरे यांच्या विरोधात आक्रमक झाला आहे. ठाकरे यांच्यावर गुन्हा दाखल करावा, अशी मागणी आयोगाने मुंबई पोलीस आयुक्तांकडे एका नोटीशीद्वारे केली आहे.

Aditya Thackeray latest news update
Breaking News : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस गडचिराेली दाै-यावर

मिळालेल्या माहितीनुसार, 'सेव्ह आरे' आंदोलनामध्ये अल्पवयीन मुलांचा वापर केल्याचा आदित्य ठाकरेंवर आरोप करण्यात आला असून सह्याद्री फोरमचे धृतिमान जोशी यांनी ठाकरे यांच्या विरोधात तक्रार दाखल केली आहे. दरम्यान, आयोगाने CPCR कायदा, 2005 च्या 13(1)j अन्वये या प्रकरणाची दखल घेत असे कृत्य बाल न्याय (मुलांची काळजी आणि संरक्षण) च्या कलम 75 चे उल्लंघन असल्याचे प्रथमदर्शनी मत व्यक्त केलं आहे.

Aditya Thackeray latest news update
आगामी निवडणुकांसाठी रणनीती, राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या बैठकीत होणार खलबतं

अधिनियम,2015,बाल आणि किशोरवयीन कामगार (प्रतिबंध आणि नियमन) कायदा, 1986, भारतीय संविधानाचा अनुच्छेद 21 (जगण्याचा अधिकार) आणि कलम 23 (संरक्षणाचा अधिकार) आणि भारतीय दंड संहिता, 1860 च्या संबंधित कलमांन्वये संबंधित व्यक्तींविरुद्ध तात्काळ एफआयआर दाखल करून या प्रकरणाची तातडीने चौकशी करा. बाल न्याय अधिनियम,2015नुसार मुलांची ओळख पटवून त्यांचे जबाब नोंदवण्यासाठी बाल कल्याण समितीसमोर हजर करा, अशी सूचना आयोगाने पोलीस आयुक्त विवेक फणसाळकर यांना दिली आहे.

Edited By - Naresh Shende

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com