विजय पाटील, साम टीव्ही सांगली
राज्यात सध्या दुष्काळाची स्थिती आहे. यावरून राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी सरकारवर टीका केली आहे. इलेक्शनच्या मोडमधून सरकार बाहेर पडले असेल, तर त्यांनी थोडं दुष्काळकडेही लक्ष द्यावं, अशा शब्दात जयंत पाटील यांनी सुनावलं आहे. तसंच मागे मराठवाड्यात मंत्रिमंडळाची बैठक फक्त शोबाजीसाठी घेतली होती का? असा सवाल देखील जयंत पाटील यांनी केला आहे. त्यांनी त्यांच्या x अकाउंटवर पोस्ट करत सरकारला खडेबोल सुनावले आहेत.
पोस्टमध्ये जयंत पाटील (Jayant Patil) म्हणाले की, राज्यातील ७५ टक्क्यांपेक्षा जास्त भाग दुष्काळाच्या छायेत (Water Crisis) आहे. परंतु, सरकारकडून टॅंकरचं नियोजन करण्यात येत नाही. शिवाय जनावरांना चारा देखील उपलब्ध करून देण्यात येत नाही, असा गंभीर आरोप देखील त्यांनी महायुती सरकारवर केला आहे. दुष्काळाच्या मुद्द्यावरून शरद पवारांनंतर आता जयंत पाटीलांनी आपल्या X अकाउंटवरून पोस्ट करत सरकारवर (Eknath Shinde) निशाणा साधला आहे.
मागील वर्षी पुरेसा पाऊस झालेला नाही, म्हणून संपूर्ण राज्याला दुष्काळाची झळ बसत आहे. विरोधक म्हणून आम्ही नागपूरच्या हिवाळी अधिवेशनापासून हे मुद्दे मांडत आहे. परंतु, देशातील आणि राज्यातील राज्यकर्त्यांना निवडणुकांच्या जुळवाजुळवीतून उसंत मिळाल्यानंतर या प्रश्नांकडे लक्ष जाईल, असा टोला देखील जयंत पाटील यांनी लगावला (Devendra Fadnavis Ajit Pawar) आहे.
राज्यातील एकूण १९ जिल्ह्यात दुष्काळ जाहीर केला होता. आज राज्यातील ७५ टक्क्यांपेक्षा जास्त भागात दुष्काळ आहे. राज्यातील धरणांमध्ये दहा ते वीस टक्के इतकाच पाणीसाठा सध्या उपलब्ध आहे. शरद पवार (Sharad Pawar) साहेब यांनी राज्यातील दुष्काळाच्या परिस्थितीसंदर्भात पत्रकार परिषद घेतली होती. पवार साहेबांनी काही मागण्याही सरकारकडे केल्या आहेत. इलेक्शन मोडमधून बाहेर आला असाल, तर सरकारने तातडीने या मागण्यांवर लक्ष द्यावे, असं जयंत पाटील यांनी पोस्टमध्ये म्हटलं आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.